मृत्यू....... #Death

Bhairav Diwase
0
सजवत होते मला
मी शांत निजलो होतो..!
बहुतेक आसवांच्या धारेन
मी चिंब भिजलो होतो..!

शेवटची आंघोळ ती
होती गरम पाण्याची..!
ज्याला त्याला घाई
मला डोळे भरून पाहण्याची..!

ज्यांच्या खांद्यावर माझं
गेलं होत बालपण..!
त्यांनीच पुन्हा उचलून
घेतलं आज पण..!

जवळचे सारे होते
होतं कुणीतरी परकं..!
'न्हेऊ नका' मोठ्यानं
म्हणत होतं सारखं..!

आज वेगळंच
काहीतरी घडत होतं..!
वैऱ्याचं ही प्रेम
माझ्यावर पडत होतं..!

तिथपर्यंत नेऊन सुद्धा
माझ्यावर प्रेम लुटवत होते..!
जोरजोरात रडून
सगळे मला उठवत होते..!

अजून चार लाकडं द्या
म्हणजे तेवढ्यात भागेल..!
माझ्याच कुणीतरी विचारलं
अजून किती वेळ लागेल..!

सरणावर झोपूनही
मी मौन पाळलं होतं..!
जिव लावणाऱ्या माझ्यांनीच
मला जाळंल होतं..!

नशिबाला कुणाच्या हसू नये
नशिब कुणी विकत घेत नाही,
वेळेचे नेहमी भान ठेवावे
वाईट वेळ सांगून येत नाही!

बुद्धी कितीही तल्लख असली
नशिबाशिवाय जिंकता येत नाही,
बिरबल बुद्धीवान असला तरीही
राजा तो होऊ शकला नाही!

एक दुसर्‍यासाठी जगणे
याचेच नाव जीवन असते,
म्हणूनच वेळ त्यांना देणे
ज्यांचे तुमच्यावर प्रेम असते !

नाती तागडीत तोलू नये
पैश्याची ती गुलाम नसतात,
नात्यात फायदा बघू नये
ती तुम्हाला श्रीमंत करतात!

तुमच्याकडे MARUTI असो वा BMW
रस्ते त्यांचे एकच असतात,
मनगटाला TITAN वा ROLEX असो
वेळ एकच दाखवत असतात !

मोबाईल APPLE असो वा SAMSUNG
तुम्हाला फोन करणारे बदलत नसतात,
Economy आणि Business Class
प्रवासाला वेळ सारखाच घेतात!

श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यात
अर्धी श्रीमंती खर्चून जाते,
कमाई कमी जास्त असली तरी
जेवणात पोळी एकाच आकाराची असते!

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)