पुन्हा प्रेम करणार नाही..... #poem #Poetry

Bhairav Diwase


भेट आपली शेवट्ची असुन
निरोप घेत आहे…
वरुन शांत असले तरी
ह्र्दयात रडत आहे…

जात आहे सोडुन मला
नाही अडवणार मी तुला…
असशील तिथे सुखात रहा
याच शुभेच्छा तुला…

निरोप तुला देताना
अश्रु माझे वाहतील….
काऴजाच्या तुकड्याना
सोबत वाहुन नेतील…

त्या वाहणाऱ्या अश्रुतही
प्रतिबिंब तुझेच असेल…
निट निरखुन पहा त्याला
प्राण मात्र त्यात दिसेल…

वाट आपली दुभंगली आता
 परत भेटणे नाही…
 प्रवास जरी एक आपला
 मार्ग एक होणे नाही…

 आठवण तु ठॆवु नकोस
 मी कधीच विसरणार नाही…
 भेटणे तुझे अशक्य तरी
 वाट पाहणे सोड्णार नाही…

 जातेस पण जाताना
 एवढे सांगुण जाशील का?
 भेट्लो जर कधी आपण…
 ओळख तरी देशील का?

 जाता जाता थोडे तरी…
 मागे वळुण पाहाशील का?
 प्रत्यशात नाही तरी…
 डॊळ्य़ानी बोलशील का?

 बोलली नाही तु जरी…
 नजर तुझी बोलेल का?
 गोधंळलेल्या अत:करणाची…
 खबर मला सांगेल का?

 कुठॆतरी ह्र्दयात
 इतिहास सारा आठवशील
 तो आठवण्यापुरता तरी तु…
 नक्कीच माझी राहशील

 नजरेने जरी ओळखलेस तु…
 शब्दानीं मी बोलणार नाही
 तुझ्या माझ्या आयुष्यात…
 नसती वादळ असणार नाही

नेहमीच पराभव झाला तरी….
 हक्क तुझ्यावर सांगणार नाही
 पण तुझी शपथ
 पुन्हा प्रेम करणार नाही..

पुन्हा एकदा आयुष्यात
भेट माझी घेशील का?
माझ्यावर जस प्रेम केलं
नवऱ्यावर तसच करशील का?

आयुष्याच्या वळणावर 
पुन्हा तशीच भेटत रहा,
अन्याय झाला तुझ्यावर तर
अन्यायाविरुद्ध पेटत रहा.

तू दिलेल्या वचनाला
आज घेऊन फिरतो आहे,
आयुष्यात तू नसली तरी
तुझेच धडे गिरवतो आहे.

हृदयावर घाव घालताना
तुला काहीच वाटलं नाही,
माझे हृदय तोडताना
काळीज का बरं तुझे 
फाटले नाही.