💻

💻

चंद्रपुरात होतेय ग्राहकांची फसवणूक #Cheating

नागरिकांनी दक्ष राहण्याचे पोलीस विभागाचे आवाहन
चंद्रपूर:- जिल्ह्यातील मोबाईलधारकांना कौन बनेगा करोडपतीच्या नावाने बनावट फोन येतात. व्हॉट्सॲप मॅसेज, ऑडिओ क्लिप पाठविली जात आहे.
कौन बनेगा करोडपतीमध्ये २५ लाखांची लॉटरी आपणास लागली असे सांगितले जाते. त्या लॉटरीची रक्कम मिळविण्यासाठी बॅंक अकाऊंटचा तपशिल मागविला जातो. सोबतच इतर अत्यावश्यक माहिती मागविली जात आहे. या माहितीच्या आधारावर बँकेतील रक्कम लंपास केली जात असल्याची प्रकरणे उघडकीस आलीत. याची तक्रार ग्राहक पंचायतीकडं करण्यात आली. त्यानंतर पोलीस सक्रिय झाले आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.
२५ लाखांची लॉटरी लागल्याचे मेसेज चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, भद्रावती, चंद्रपूर शहरातील तिघे अशा प्रकारात लुटल्या गेले आहेत. विशेष म्हणजे सुशिक्षित या प्रकाराला बळी पडले आहेत. कौन बनेगा करोडपतीच्या नावाने ऑनलाईन लुटमारीचे प्रकार चंद्रपुरात घडू लागले आहेत. २५ लाखांची लॉटरी लागली, असा मेसेज अथवा भ्रमणध्वनी धडकतो.
लालसेपोटी लुटमारीचा खेळ सुरू होतो. या प्रकाराने डोकं वर काढताच पोलीस दक्ष झालेत. कुणाकुणाची फसवणूक झाली याची चौकशी सुरू आहे. हे चोर कशाप्रकारे फसवितात. याचा तपास आता सायबर पोलिसांना करावा लागणार आहे. ग्राहकांनी सावध असले पाहिजे, असे आवाहन आता पोलीस करत आहेत.
भावनेच्या आहारी जाऊ नका पोलिसांनी शहरात बॅनर लावून या प्रकारापासून दूर राहण्याचे आवाहन केले. असा मेसेज तुम्हालाही आला असेल तर दुर्लक्ष करा. भावनेच्या आहारी गेलात तर लुटीला बळी पडालं, अशी सूचना पोलिसांनी केली आहे. हा प्रकार लक्षात येताच भद्रावती ग्राहक पंचायतने पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे, अशी माहिती चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधाकर अंभोरे यांनी दिली. मला लॉटरीचे पैसे मिळतील म्हणून भावनेच्या आहारी जाऊ नका, याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन आता पोलीस करत आहेत. त्यामुळं सावध होण्याची वेळ आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत