Top News

तालुक्यातील ग्रामीण भागात उमेद अभियानाचे वेगवेगळे उपक्रम #sindewahi

सावित्रीबाई फुले महिला ग्रामसंघाची उपजीविकेकडे वाटचाल
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या अंतर्गत सावित्रीबाई फुले महिला ग्रामसंघ, नांदगांव तालुका सिंदेवाही च्या वतीने आठवडी बाजार (रुलर हॅट) उदघाटन सोहळा पार पाडला गेला .गावांतील महिलांना रोजगार मिळावे व समूहाच्या महिलांचे विविध वस्तूचे उत्पादन गावस्तरावर होते व महिला बाहेर गावी जाऊन विक्रीसाठी तयार होत नाही करिता ग्रामसंघाच्या वतीने मिटिंगमध्ये ठराव घेण्यात आले व ग्रामपंचायत ची मंजुरी घेऊन सर्वानुमते आज आठवडी बाजार सुरू करण्यात आले त्यामुळे महिलांची उपजीविका निर्माण होईल व महिला उन्नत बनतील हाच अभियानाचा उद्देश समोर ठेवण्यात आले. 
सदर कार्यक्रमाचे उदघाटक सौ.मंदाताई बाळबुद्धे पंचायत समिती सभापती, कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. अर्चनाताई नन्नावरे सरपंच, नांदगाव प्रमुख अतिथी श्री.आनंदराव सोनवाने उपसरपंच ,श्री.भगवान मेश्राम तंटामुक्त समिती अध्यक्ष, श्री. शांतीलालजी गोंडाने माजी सरपंच ,श्री.गुरुदासजी बोरकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक,सौ.गजलवार मॅडम, श्री.लोनबले सर ,श्री.दडमलजी शाळा व्य. समिती ,श्री.रघुनाथ बोरकर,श्री.अरुनजी शहारे, श्री.ज्ञानेश्वर गोंडाने, श्री.नीलकंठ गहाणे,श्री.राजेन्द्र कोसरे, श्री.सुभाष मूढरे , ग्रामसंघ अध्यक्ष सौ.अर्चना चनफने, सचिव सौ. गीता बन्सोड उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री.विवेक नागरे तालुका अभियान व्यवस्थापक यांनी केले .श्री.उद्धव मडावी तालुका व्यवस्थापक , श्री.ज्ञानेश्वर मलेवार प्रभाग समन्वयक,श्री. संदिप उईके प्रभाग समन्वयक ,कु.सविता उईके प्रभाग समनव्यक,ग्राम पंचायत सदस्य , पोलीस पाटील, आशा वर्ककर, अंगणवाडी सेविका उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सौ.इंद्रायणी शहारे व आभार प्रदर्शन सौ.गीता बन्सोड यांनी केले. कार्यक्रम येशस्वितेकरिता श्रीमती.स्वेता मडावी,सौ.वंदना मूढरे ,सौ.ज्योती गोंडाने,सौ.अर्चना कुंभरे ,श्री.प्रभाकर मानकर यांनी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने