Top News

अम्माच्या भेटीला महसुल मंत्री पोहचले राजमाता निवासस्थानी #chandrapur


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून अपक्ष निवडणूक लढवत ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात चर्चिले गेले. मात्र या नावापेक्षाही अधिक चर्चा होती ती अम्मा म्हणजेच जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई जोरगेवार यांची, कारण या मातेने निरक्षर असून सुध्दा फुटपाथवर टोपल्या विकुन आपल्या मुलाला आमदार बनविले होते. आज याच मातेची भेट घेण्यासाठी राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी पोहचले.
यावेळी त्यांच्या सोबत मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, विधान परिषदेचे आमदार अभिजीत वंजारी, अतुल लोंढे, काॅंग्रेस कमेटीचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, काॅंग्रेस शहर कमेटी अध्यक्ष रामू तिवारी, नगर सेवक नंदु नागरकर, यांचीही उपस्थिती होती.
अम्मा म्हणजेच गंगुबाई जोरगेवार यांच्या जिवणाचा संघर्षमय यशस्वी प्रवास अनेकांनासाठी प्रेरणादाई असाच आहे. महानगरपालिकेच्या इमारतीसमोर उन्ह, पावसात टोपल्या विकणार्या या माऊलीच्या कष्टातून आणि त्यागातून चंद्रपूरात ईतिहास घडला. निरक्षर असूनही या माऊलीने आपल्या मुलांना दिलेले संस्कार आणि त्यातून घडलेल्या ईतिहासाचे संपूर्ण चंद्रपूरकर साक्षी बनले आहे. अशा माऊलीच्या भेटीला आज राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात पोहचले.
 महसुल मंत्री बाळासाहेब थोरात आज चंद्रपूर दौ-र्यावर होते. यावेळी त्यांनी व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत अम्माची भेट घेतली. या भेटी करिता सायंकाळी साडे पाच च्या सुमारास ते आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी पोहचले. याप्रसंगी मराठमोळ्या पारंपारिक पध्दतीने ना. बाळासाहेब थोरात यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी अम्मा सोबत चर्चा केली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
यावेळी चंद्रपूरातील विविध प्रश्नांवरही आमदार किशोर जोरगेवार यांनी ना. थोरात यांच्याशी चर्चा केली. संविधानाचे पुस्तक, बांबू पासून तयार झालेली डायरी, ग्रामगीता, आणि तिरंगा ध्वज यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी ना. बाळासाहेब थोरात यांना देत त्यांचे स्वागत केले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप, शहर संघटक पंकज गुप्ता, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहराध्यक्ष राशेद हुसेन, राम जंगम, रुपेश पांण्डेय, राहुल मोहुर्ले, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, सायली येरणे, अस्मिता डोणारकर, चंदा ईटनकर, कौसर खान, शमा काजी, वैशाली मद्दीवार, प्रेमीला बावणे, नंदा पंधरे, अनिता झाडे, वैशाली मेश्राम, माधूरी बावणे, दत्तू भोयर, माला पेंदाम यांच्यायह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या अगोदर जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे चंद्रपूर दौर्यावर असतांना त्यांनीही अम्माची भेट घेतली होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने