जिल्हा परिषद चंद्रपूरतर्फे चष्मे वाटप व भव्य नेत्र तपासणी शिबीर संपन्न #Chandrapur #gughus

घुग्घुस परिसरातील जनतेपर्यंत आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध:- भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- शुक्रवार 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता घुग्घुस येथील प्रयास सभागृहात जिल्हा परिषद चंद्रपूरतर्फे मोफत चष्मे वाटप व भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
🙏
कार्यक्रमाचे उदघाटन भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
मनोगत व्यक्त करतांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले आरोग्याची सेवा गोरगरीब जनतेपर्यंत पोहचविणे हा आमचा सेवाव्रत आहे. आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र घुग्घुसतर्फे गोर गरीब, गरजू व जेष्ठ नागरिकांना आरोग्याच्या विविध सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे आता पर्यंत जेष्ठ नागरिकांच्या 8 तुकडया सेवाग्राम येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आल्या आहेत नरसेवा हीच ईश्वर सेवा होय आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सेवेचा संदेश दिला आहे.
🙏 त्यामुळे आरोग्य सेवेचे कार्य आम्ही निरंतरपणे करित आहोत आतापर्यंत आरोग्य सेवा समितीच्या माध्यमातून परिसरातील अनेक गोरगरीब गरजू लोकांची मोफत हृदयविकाराची शस्त्रक्रिया, कर्करोगाची शस्त्रक्रिया करून देण्यात आली आहे.
याप्रसंगी घुग्घुस परिसरातील शेकडो जेष्ठ नागरिकांची नेत्र तपासणी तज्ञ डॉक्टरामार्फत करण्यात आली तसेच त्यांना चष्म्याचे मोफत वाटपही करण्यात आले.
🙏
यावेळी नकोडा जि. प. सदस्य ब्रिजभूषण पाझारे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जि. प सभापती नितूताई चौधरी, जि. प. आरोग्य विभागाचे डॉ. साठे, माजी पं. स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिगांडे, माजी उपसरपंच संजय तिवारी, विनोद चौधरी, साजन गोहने, वैशाली ढवस, मल्लेश बल्ला, गुरूदास तग्रपवार, बबलू सातपुते, राजेश मोरपाका, शरद गेडाम, प्रवीण सोदारी, विनोद जंजर्ला, संजय भोंगळे, मधुकर मालेकर, राजाजी रेड्डी, विवेक तिवारी, विक्की सारसर, वमशी महाकाली, सिनू कोत्तूर, तुलसीदास ढवस, सुनीता पाटील यांसह आदी मंडळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत