जाहिरात... Advertisement... विज्ञापन

किराणा दुकानातून होणा-या दारु विक्रीचा पुनर्विचार करा #chandrapur

जम्मू-काश्मिरातून तरुण सैनिकाची महाराष्ट्र शासनाला विनंती
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- किराणा दुकानातून होणा-या दारु विक्रीचा पुनर्विचार करावा अशी विनंती मागील दहा वर्षांपासून जम्मू-काश्मिर खो-यात कर्तव्यावर असलेल्या तरुण सैनिकाने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
अशोक ढोके असे या तरुण सैनिकाचे नाव असून ते वरोरा तालुक्यातील पिजदुरा येथील रहिवासी आहेत. ते मागील १० वर्षापासून जम्मू काश्मिर खो-यात सैनिक म्हणून तैनात आहे. मनोज हे सैनिक म्हणून देशाची सेवा करीत आहेत.
 महाराष्ट्रातील राज्य शासनाने किराणा दुकान व मॉल मध्ये वाईन किंवा दारू विक्रीचा निर्णय नुकताच घेतला. याबाबत  अनेक समाजिक व धार्मिक संघटनांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा याबाबत शासनाला निवेदने सादर केली आहेत.
          मनोज ढोके यांनी किराणा दुकानातून होणा-या दारूविक्रीला विरोध केला असून शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा व महाराष्ट्रातील युवापिढीला नशेपासून दुर ठेवावे असे निवेदनात नमुद केले आहे.
       सदर निवेदन जम्मू-काश्मिर येथील जिल्हाधिकारी यांच्या  मार्फत मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना पाठविण्यात आले आहे. तसेच सैनिक अधिकारी यांना सुध्दा याबाबत निवेदन दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत