शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या #chandrapur

Bhairav Diwase
कोरपना:- तालुक्यातील लखमापूर येथील लक्ष्मण लटारी काकडे (५६) यांनी आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून शुक्रवारी आत्महत्या केली. त्यांच्यावर स्टेट बँक लखमापूर शाखेचे १ लाख ५६ हजार रुपये थकीत असल्याने ते व्यथित होते.
कर्जबाजारीपणामुळे लक्ष्मण काकडे यांनी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान विष प्राशन केल्यानंतर मुलाला कळताच त्यांनी तात्काळ वडिलांना जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे भरती केले.
मात्र शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूने काकडे परिवारावर संकट ओढवले असून त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. काकडे परिवाराने सगळीकडे मदतीसाठी याचना केली आहे.