शासकीय इतमामात जवानाला शेवटचा निरोप #army

Bhairav Diwase

सादागड स्मशानात झाला अंतिम संस्कार; आर्मी बटालियनने दिली सलामी

यावेळी आर्मी बटालियन व जिल्हा प्रशासनाची सलामी देण्यात आली. मृत जवानाच्या अंतिम संस्कारासाठी जिल्हा प्रशासनाने फर्मान काढल्याने संपुर्ण प्रशासन अंतिम संस्काराला उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी खेडकर साहेब, तहसीलदार परिक्षीत पाटील, नायब तहसीलदार सागर कांबळे, पोलीस निरीक्षक आशिष बोरकर, कृषी अधिकारी आडे, वनरक्षक लंकेश आखाडे, एस .डब्ल्यू शेंडे सोबतच जिल्हा प्रशासनाचे अनेक कर्मचारी उपस्थित होते.
आशिष जनार्दन मंगाम वय 27 वर्ष रा. सादागड हा युवक 2014 ला आर्मी मध्ये भरती झालेला होता. सात वर्ष सेवा केल्यानंतर नुकतेच त्यांच्या पोटात दुखत असल्याची आणि त्यानतर मृत झाल्याची माहिती आर्मी विभागाकडून जवानाच्या परिवाराला देण्यात आली.
सदर युवा सैनिक हा अविवाहित असून त्याच्या पश्च्यात भाऊ, आई-वडील असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. अतिशय होतकरू व खेळाडू वृत्तीच्या असलेला हा युवक 2014 मध्ये आर्मी मध्ये भरती झालेला होता आणि तो त्या ठिकाणी स्पोर्ट साठी प्रसिद्ध होता. दिल्लीला आर्मी मध्ये काम करत असतानाच तो स्पोर्ट साठी मेरठ येथे आलेला  असल्याची माहिती आहे आणि  नंतर त्याच्या पोट दुखीचा त्रास वाढल्यामुळे त्यांना तेथील रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले  आणि उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला या बाबताची माहिती सदर विभागाने त्यांच्या परिवाराला देण्यात आली.
 आज (दि २८) ला शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आला. अतिशय गरिब कुटुबांतील युवा सैनिकाच्या अकस्मात मृत्युने आई, वडीलासह परिवावर दुखाचे डोंगर कोसळले आहे. सादागड गावासह तालुक्यातील जनतेकडुन  जवानाच्या मृत्युने शोक व्यक्त केला जात आहे.