लोकसमृद्धीचे शिवरात्रीच्या शुभ पर्वावर उद्घाटन #bhadrawati

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- लोकसमृद्धी बचत निधी लिमिटेड या संस्थेचा उद्घाटन सोहळा दि.१ मार्च रोजी दुपारी १२ वाजता महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर वरोरा तालुक्यातील शेगांव(बु.) येथे संपन्न होणार आहे.
चिमूर-वरोरा मार्गावरील आष्टा-वडाळा बस थांब्यावर असलेल्या संस्थेच्या प्रांगणात हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून खा.बाळूभाऊ धानोरकर, सहउद्घाटक आ.प्रतिभाताई धानोरकर राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे संचालक रवींद्र काळमेघ राहणार आहेत.तर प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर जिल्हा परिषदेचे बांधकाम व वित्त सभापती राजू गायकवाड,चं.जि.म.सह.बॅंकेचे माजी अध्यक्ष रवींद्र शिंदे, शेगांव ग्राम पंचायतचे सरपंच सिद्धार्थ पाटील आणि कृषी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष केशव बु-हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.