Top News

जनसेवा हीच ईश्वर सेवा.... #Chandrapur

भाजयुमो मध्य बाजार मंडळ अध्यक्ष गणेश रामगुंडेवार यांनी बेशुद्धावस्थेत पडलेल्या अज्ञात वृद्धाला दिला "आधार"
चंद्रपूर:- नेताजी चौक हनुमान खिडकी रोड दादमलवाडा चौकात अज्ञात वृद्ध सुमारे 6 तासांपेक्षा अधिक वेळापासून बेशुद्ध अवस्थेत रस्त्याच्या एका बाजूला पडलेला होता. समाजसेवा हिच ईश्वर सेवा या भावनेतून कार्य करणारे हनुमान मंदिर समिती सदस्य आशिष अलचावार यांना निदर्शनास आले.

त्यांनी त्वरित भाजयुमो मध्य बाजार मंडळ अध्यक्ष गणेश रामगुंडेवार यांना संपर्क केले असता सेवा कार्यात अग्रेसर असणारे गणेश रामगुंडेवार यांच्या नेतृत्वात जनकल्यानासाठी झटणारे गणेश रामगुंडेवार यांच्या तर्फे आपले कर्तव्य भान ठेवून त्यांना पाणी पिण्यास देऊन बेशुद्ध व्यक्तीला शुद्धीवर आणण्यात आले, आणि त्यांना ऊर्जा मिळावे यासाठी नाश्ता ची व्यवस्था केली, आणि नंतर आडोश्याला बसविले. नंतर त्या वृद्ध काकांना आंघोळ करून शुद्ध करण्यात आले, सोबतच नवीन कपडे परिधान करून सुस्थितीत करण्यासाठी दवाखाना येथे दाखल करून औषधोपचार करण्यात आले.
त्यानंतर अन्नभोजन करण्यास दिले. सोबतच त्यांना सुखरूप घरी नेण्यासाठी धडपड करण्यात आली. त्यांना विचारल्यास ते आरवट येथील असल्याचे कळले. गावातील प्रतिष्ठित रंजित डवरे बंधुशी संपर्क करून त्यांच्या गावी परिवार सदस्यास मुलगा सतीश यांना सुपूर्द करण्यात आलेत.
काकांचे नाव महादेव टेकाम आहेत असे कळले. या समाजसेवी कार्यात गणेश रामगुंडेवार यांच्या नेतृत्वाखाली हनुमान मंदिर समिती सदस्य मोहन मंचलवार, आशिष अलचावार, गणेश नन्नावरे, विलास नागुलवार, रमेश कोडबतुनवार, विपीन येंगलवार यांचे सहकार्य द्वारे सेवाकार्य करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने