Top News

विजय वडस्कर राज्यस्तरीय सेट परीक्षा उत्तीर्ण #Rajura

ठाणेदारांनी केला शाल व श्रीफळ देऊन सत्कार
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- पोलस स्टेशन विरूर येथील भरती पूर्व प्रशिक्षण घेणारा येथील वाचनालयातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी विजय वडस्कर रा. मूर्ती हा राज्यस्तरीय सेट ही परीक्षा उत्तीर्ण झाला.
कोरोना महामारी संकटाच्या रोगामुळे मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात मधील निर्बंधामुळे शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस, लायब्ररी, चालू-बंद होत होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून मुकावे लागले. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणी चे सामने करावे लागले. त्यातच चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील विरूर पोलीस स्टेशन येथे आधी शिक्षकी पेशात असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण हे ऑगस्ट 2020 मध्ये पोलीस स्टेशनला एकशिक्षकी देवदूत म्हणून रुजू होताच त्यांच्या मनामध्ये शिक्षणाबद्दल व सामाजिक कार्याबद्दल कार्य करण्याची इच्छा एक प्रेरित होती.
त्यांनी आधी आदिवासी मागास अतिदुर्गम भाग असलेल्या जिवती तालुक्यातील आसापुर येथे 45 घरांची वस्ती असलेल्या गावात शिक्षकी कार्याचा पेशा बजावत पोलीस खात्याची परीक्षा देऊन पोलीस खात्यामध्ये प्रवेश केला. रुजू झाल्यावर काही दिवसातच विरूर पोलीस स्टेशन येथे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण सुरू केले. व वाचनालयातील विद्यार्थ्यांना स्वतः मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना घडवत आहे. अशाच परिस्थितीत 52 विद्यार्थी व विद्यार्थिनी वाचनालयातून पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचे तयारी करीत आहे. त्यातूनच विजय वडस्कर रा. मूर्ती या विद्यार्थ्याने राज्यस्तरीय सेट अर्थशास्त्र विषयात परीक्षा देऊन उत्तीर्ण झाला असून विरूर स्टेशन कडून त्याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षक  राहुल चव्हाण, पो. ह. दिवाकर पवार, विजय मुंडे, पो. ह. मल्लय्या नर्गेवार, अतुल सहारे, स्वप्नील चांदेकर, विकास मार्कंडे, दिनेश गरमळे, विजय तलांडे व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
   
 माझ्या मनात सामाजिक कार्याची व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची एक इच्छा प्रेरित आहे. यामुळे असे विद्यार्थी नेहमी घडत रहावे. म्हणून विरूर पोलीस स्टेशनला रुजू झाल्यापासून हे नवनवीन उपक्रम सुरू आहे. 
 राहुल चव्हाण 
 सहाय्यक पोलीस निरीक्षक विरूर स्टेशन

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने