दरवर्षी 14 फेब्रुवारीला आपल्या देशात आणि जागतिक पातळीवर काही देशांमध्ये व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. मात्र व्हॅलेंटाईन डे हा पाश्चिमात्य देशांत साजरा होणारा सण असून तो आपल्या देशात येऊन आपली संस्कृती व सभ्यता नष्ट करत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील तरुणांनी व्हॅलेंटाइन डे ही पाश्चिमात्य संस्कृती साजरी करू नये असे आवाहन बजरंग दलाकडून करण्यात आले आहे.
या संदर्भात बजरंग दल चंद्रपूर चे महानगर संयोजक तुषार चौधरी यांनी 13 फेब्रुवारी रोजी संपूर्ण जिल्ह्यात मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. देशात प्रेमाच्या नावाखाली अश्लीलता पसरवणारा दिवस बजरंग दल कधीही मान्य करणार नाही, असे ते म्हणाले. तसेच 14 फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात आपले काही सैनिक शहीद झाले आणि त्याच दिवशी आपण व्हॅलेंटाइन डे साजरा करणे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.