Top News

दहा लाखांची खंडणी मागणाऱ्याला रंगेहात अटक

चंद्रपूर:-  यातील फिर्यादी उपकार्यकारी अभीयता महावितरण गडचांदुर जि. चंद्रपुर यांना आरोपी सौरभ विजय बुरेवार चंद्रपुर याने माहीती अधिकारा अंतर्गत माहीती मागवुन बोगस बिल सादर केल्याबाबतची नविन तक्रार वरिष्ठ कार्यालयात करणार नाही व आधीची तक्रार वापस घेणार याकरीता १० लाख रुपये खंडणीची मागणी करीत होता परंतु फिर्यादी यांना त्यांना पैसे देन्याची इच्छा नसल्याने त्यांनी पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांना भेटून तकार केली त्यावरून पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना कार्यवाही करन्याचे आदेश दील्याने पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पोउपनि अतुल कावळे यांना पथकासह सापळा रचत कार्यवाही करुन आरोपीला रंगेहात पकडन्याचे आदेश दिल्याने फिर्यादी उपकार्यकारी अभीयंता महावितरण यांना भेटुन आरोपी याने खंडणीची मागणी केल्याची खात्री करून आरोपी याने फिर्यादीस दीनांक १०/०२/२२ ला रोमा बार, बेबी लॉन, चंद्रपुर येथे भेटायला येणास सांगितले.

 तेव्हा रोमाबार बेबी, चद्रपुर येथे पोउपनि अतुल कावळे यांनी दोन सरकारी पंच व स्थानिक गुन्हे शाखा टीम सह येथे जावुन सापळा रचला त्यानंतर आरोपी सौरभ बुरेवार फिर्यादीस बोगस बिल सादर केल्याबाबतची नविन तकार वरिष्ठ कार्यालयात करणार नाही व केलेली तक्रार मागे घेण्याकरिता तडजोडीअंती ५ लाखाची मागणी करून टोकन म्हणून ५०,०००/- रुपये खंडणीच्या स्वरुपात घेताच त्याला खंडणीच्या रक्कमे सह रंगेहात पकडन्यात आले. व आरोपीस ताब्यात घेवून पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध कमांक ११५/२०२२ कलम ३८४ भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची यशस्वी कामगीरी अरविंद साळवे पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पो. नि. बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा यांचे सह स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलीस उप निरीक्षक अतुल कावळे, स.फौ. पंडीत बरह्हाडे, नापोशि मिलींद चव्हान, अनुप डांगे, जमिर पठान, संतोष येलपुलवार, दीपक डोंगरे, नितेश महात्मे, पोशि प्रमोद कोटनाके, मयुर येरणे, सायबर सेल येथील पो हवा. अली मेजर, पोशि भास्कर यांनी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने