Top News

पोंभुर्णा तालुक्‍यातील रस्‍त्‍यांच्‍या मजबुतीकरणासाठी खनिज विकास निधी अंतर्गत १ कोटी ७० लक्ष ०४ रू. निधी मंजूर pombhurna

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत
चंद्रपूर:- विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पोंभुर्णा आणि मुल तालुक्‍यातील रस्‍त्‍यांचे मजबुतीकरण व कॉंक्रीटीकरण करण्‍यासाठी खनिज विकास निधीतुन १ कोटी ७० लक्ष ०४ हजार रू. किंमतीच्‍या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्‍यता देण्‍यात आली आहे.
जिल्‍हाधिकारी चंद्रपूर यांनी दिनांक १० फेब्रुवारी २०२२ रोजीच्‍या आदेशान्‍वये प्रशासकीय मान्‍यता प्रदान केली आहे. या मंजूर कामांमध्‍ये पोंभुर्णा तालुक्‍यातील बामणी ते स्‍मशानभूमी रस्‍त्‍याच्‍या मजबुतीकरणासाठी १३.९७ लक्ष रू., चेक ठाणेवासना येथील रस्‍त्‍याच्‍या मजबुतीकरणासाठी २५.५४ लक्ष रू., देवाडा बुज ते बोरघाटपर्यंतच्‍या रस्‍त्‍याच्‍या मजबुतीकरणासाठी २९.२७ लक्ष रू., घाटकुळ येथील श्री. पत्रु देवाडे ते श्री. मोहन पावडे यांच्‍या घरापर्यंत रस्‍त्‍याच्‍या मजबुतीकरणासाठी १९.७४ लक्ष रू., घाटकुळ येथील रस्‍त्‍याच्‍या मजबुतीकरणासाठी ३० लक्ष रू., चेक ठाणेवासना येथील श्री. यादव कुमरे यांच्‍या घरापासून श्री. दिवाकर टोंगे यांच्‍या घरापर्यंत रस्‍त्‍याचे मजबुतीकरणासाठी २५.१० लक्ष रू, पिपरी देशपांडे येथील श्री. जोधरू शेंडे यांच्‍या घरापासून श्री. रूपेश गुडपल्‍ले यांच्‍या घरापर्यंत रस्‍त्‍याच्‍या मजबुतीकरणासाठी १०.४२ लक्ष रू., आंबेधानोरा येथील श्री. वसंत आत्राम यांच्‍या घरापासुन डोंगरहळदी रस्‍त्‍यापर्यंतच्‍या सिमेंट कॉंक्रीट नालीच्‍या बांधकामासाठी ३ लक्ष रू., आंबेधानोरा येथील श्री. नरेश रेगुलवार यांच्‍या घरापासून श्री. अशोक रेगुलवार यांच्‍या घरापर्यंतच्‍या सिमेंट कॉंक्रीट नालीच्‍या बांधकामासाठी ३ लक्ष रू. तसेच मुल तालुक्‍यातील बाबराळा येथील जिल्‍हा परिषद शाळा ते बसस्‍थानकाकडे जाणा-या रस्‍त्‍याचे सिमेंटीकरण करण्‍यासाठी १० लक्ष रू. असा एकूण १ कोटी ७० लक्ष ०४ हजार रू. इतका निधी मंजूर करण्‍यात आला आहे.
जिल्‍हा परिषदेचे माजी अध्‍यक्ष तथा भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी केलेल्‍या मागणीच्‍या अनुषंगाने आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पाठपुरावा करून प्रयत्‍नपूर्वक या रस्‍त्‍यांसाठी निधी मंजूर करविला आहे. वर्षभरापूर्वी झालेल्‍या अतिवृष्‍टीदरम्‍यान पोंभुर्णा तालुक्‍यात रस्‍त्‍यांची मोठया प्रमाणावर क्षती झाली होती. आ. मुनगंटीवार यांनी केलेल्‍या पाहणी दौ-यादरम्‍यान श्री. देवराव भोंगळे यांनी सदर क्षतीग्रस्‍त रस्‍त्‍यांच्‍या मजबुतीकरणासाठी निधी मंजूर करण्‍याची मागणी आ. मुनगंटीवार यांच्‍याकडे केली होती. आ. मुनगंटीवार यांनी खनिज विकास निधीच्‍या माध्‍यमातुन सदर रस्‍त्‍यांसाठी निधी मंजूर केल्‍याने या रस्‍त्‍यांच्‍या मजबुतीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने