Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने राजिव गांधी नगर येथे हळदीकुंकु व महिलांच्या स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन #chandrapur

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- मकरसक्रांती निमित्य यंग चांदा ब्रिगेडच्या राजीव नगर महिला आघाडी शाखेच्या वतीने राजिव गांधी नगर येथे हळदीकुंकू व महिलांच्या स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील महिलांना वाण वाटप करत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाच्या महिला शहर प्रमूख वैशाली मेश्राम, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, डाॅ. शारदा येरमे, जमुना तूमराम आदि मान्यवरांची मंचावर प्रमूख पाहूणे म्हणून उपस्थिती होती.
मकर सक्रांतीनिमित्य दरवर्षी प्रमाणे यंदाही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी महिलांसाठी हळदीकुंकू व स्नेहमीलन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्याण यंग चांदा ब्रिगेडच्या राजिव गांधी नगर शाखेच्या वतीने राजिव गांधी नगर हणूमान मंदिर येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर प्रमूख कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. या कार्यक्रमात उपस्थित महिलांना मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. हळदीकुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना व्यासपीठ उपलब्ध होत आहे.
या कार्यक्रमानिमित्य एकत्रीत आलेल्या महिलांनी वाणासह विचांराचीही देवाण घेवाण करण्याची गरज यावेळी बोलतांना यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर यांनी बोलून दाखवली. सदर कार्यक्रमात यंग चांदा ब्रिगेडच्या महिला सदस्यांनी उपस्थित महिलांना वाणांचे वाटप करत मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्यात या कार्यक्रमाला लता पेटकूले, हसंकला पेटकर, मोनाली केदार, तारा उमाटे, रजनी कावळे, संगीता गायकवाड, गीता कोडापे, शिला मुंडरे, मंदा नवले, माधूरी पेंदोर, ममता सातपुते, बेबीनंदा मुळे, माला ढोके, कुंदा राजगडे यांच्यासह स्थानिक महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत