'पावनखिंड' सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. 18 फेब्रुवारीला सिनेमा प्रदर्शित झाला आहे. बॉक्सऑफिसवरदेखील सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. अनेक सिनेमांगृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्डदेखील झळकत आहे. लवकरच दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकरांचा 'शेर शिवराज' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दिग्पाल लांजेकरांचा 'शेर शिवराज' सिनेमा 29 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. शिवराज अष्टक फिल्म सीरिज ही छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या जीवनावर आधारित असलेली आठ सिनेमांची सीरिज आहे. त्यातले फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड प्रदर्शित झाले आहेत. लवकरच 'शेर शिवराज' सिनेमादेखील प्रदर्शित होणार आहे.