हृदयस्पर्श आलिंगन
काय कोठे कसे भेटलो
जगावेगळ प्रेम आपल
नाही समजावून सांगता येत
लोकांनाही प्रेम आपूले
इतके वर्ष सोबत आलो
अशीच सोबती राहू दे
प्रेम नको क्षणिक सूखाचा
आयुष्यभराची सोबती हवी
क्षणाक्षणाला लागत असते भिती
दु:खाचा प्रवास सोबत काढला
सुखाचे दिवस काढायचे आहे तुझ्याच सोबती
हात तुझ्या हाती घेऊनी फिरायचे आहे रे जग
प्रश्न मला ही पडे, काय तूच मला भेटावे
जगात होती इतके माणसे
पण नाव फक्त तिथे "संजय" तुझे असावे
स्वप्न पूर्ण करत असताना
होई माझ्या जीवाची घालमेल
संसार जो मांडला
होईल का तो विस्कळीत
नको आता हे दुरावे
स्वप्न तर माझे तूच आहे
लागलेली माझी सवय आहे
बसता उठता "राज जी" तूमचे नाव
माझ्या ओठावर आहे
मन म्हणते मला, काय भेटला हा माणूस
नाते जपतो, मित्र जपत
अडीअडचणीत धावून येतो
सर्वगुणी संपन्न हा नवरा माझा
काय ग्रेट फिलिंग आहे
नवरा म्हणून तू माझा आहेस
भेटूनी झाली इतकी वर्ष
तरीही उगवणारा प्रत्येक दिवस
हा माझ्यासाठी नविन आहे
आजच्या या शुभदिनी
माझे फक्त एक मागणे
तुमची प्रगती होता-होता
हात माझा सोडू नका
तुमच्यासाठी आहे परिवार
माझ्यासाठी फक्त एकच तू
तुझा हात हातात घेतला
सारे हात दुर झाले
मन म्हणते कधी जाते माहेरा
हुदंका येतो ओले होतात पापण्या
त्याग मी केला नात्यांचा
एकमेव तुझ्याचसाठी
धरलास हात सोडू नको
शेवटच्या श्वासापर्यंत
जूळतील परत ते नाते
पाहूनी ही आपली प्रित
अश्याप्रकारे कविता, लेख प्रकाशित करण्यासाठी आजच आमच्या आधार न्युज नेटवर्क च्या https://wa.me/918007101459 या नंबरवर पाठवावे... आम्ही तुमची कविता, लेख प्रकाशित करू.