Top News

युवकांनी शारीरिक तंदुरुस्ती ठेवण्यासाठी मैदानी खेळ खेळावे:- पांडुरंग जाधव #Jivati

नगराळा येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
जिवती:- आजच्या डिजिटल युगामध्ये आजचा युवक मैदानी खेळ विसरताना दिसत आहे. आणि मोबाईल मध्ये गुंतून असताना दिसत आहे. त्यामुळे युवकांना मैदानी खेळ खेळवण्यासाठी अश्या स्पर्धेचे आयोजन करण्याची गरज आहे, युवकांनी शारीरिक तंदुरुस्ती ठेवण्यासाठी मैदानी खेळ खेळावे असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा राजुरा विधानसभा गोंडवाना गणतंत्र पार्टीचे कोर कमेटी अध्यक्ष पांडुरंगजी जाधव यांनी केले, ते नगराळा येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटनीय कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी मंचावर जिवती पंचायत समितीच्या सभापती अंजनाताई पवार, पंचायत समितीचे महेश देवकते, पंचायत समिती सदस्य सुग्रीव गोतावळे, बंजारा विकास फॉउंडेशन अध्यक्ष अरविंद चव्हाण, वनरक्षक अंबदास राठोड, नगराळा ग्रामपंचायत सदस्य राजेश राठोड, श्री. अंबु नाईक माध्यमिक आश्रम शाळा नगराळा येथील प्राचार्य व शिक्षकवृंद आणि गावकरी, युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने