भेंडवी ते परमडोली रस्त्याचे काम त्वरित सुरु करा Jivati


आम आदमी पार्टी व प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या ठोकावर वसलेल्या अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जाणार्‍या जिवती तालुक्यातील मुख्य मार्ग म्हणजे भेंडवी ते परमडोली या रस्ताचे काम गेल्या तीन ते चार वर्षापासून कासव गतीने चालू असून रस्त्यावर केवळ गिट्टी पसरलेली आहे. त्यामुळे कोणतेही वाहन चालविणे म्हणजे एक प्रकारची तारेवरची कसरत करावी लागत आहे.रस्त्याचे काम अर्धवट असल्यामुळे व जागोजागी खड्डेच खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे.या रस्त्यावर दररोज वाहन चालकांचे अपघात होत आहेत.सुदैवाने आतापर्यंत कोणाचीही जीवितहानी झाली नाही हा रस्ता अपघातास निमंत्रण देणारा ठरत असल्याने या रस्त्याचे काम त्वरीत सुरु करावे अशी मागणी आम आदमी पार्टी व प्रहार जनशक्ती पार्टी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी आम आदमी पार्टी संस्थापक सदस्य सल्लागार मिलिंद गड्डमवार, पार्टीचे जिवती ता.अध्यक्ष सुनील राठोड,तालुका सचिव सचिव गोविंद गोरे, प्रहार चे समर्थक आम आदमी पार्टी जिवती चे संघटनमंत्री जीवन तोगरे,अरविंद चव्हाण, विदर्भ पार्टीचे सुदाम राठोड, आम आदमी पार्टी उपाध्यक्ष नितेश करे, कोषाध्यक्ष गोपाळ मोहिते,संतोष पोले,दत्ता गोरे,आदीची उपस्थिती होती. यावेळी पाटण पोलीस स्टेशनं चे ठाणेदार मा.राजकुमार मडावी यांच्या मार्फत बांधकाम विभाग,पालकमंत्री,आमदार,जिल्हाधिकारी, तहसीलदार,यांना निवेदन देण्यात आले.यावेळी उपस्थित पोलीस शिपाई हनुमंत नलबले,आनंद मोरे,परमवीर कोबरे,गुंडेराव पोले यांची उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या