छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सौंदर्यकरणाचे रखडलेले काम तात्काळ सुरू करा #Korpana

Bhairav Diwase
शिवप्रेमी मित्र मंडळाची मागणी मुख्यधिकरी यांना निवेदन
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- दिनांक 21/02/22 रोजी शिवप्रेमी युवक संघटना गडचांदुर शहरातील संपूर्ण शिवप्रेमींच्या आस्थेचा विषय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सौंदर्यीकरणचे काम जवळपास एक वर्षांपूर्वी झालेल्या भूमिपूजनाचे काम हे काही शुल्लक कारणामुळे थांबले आहे दोनदा भूमिपूजन होऊन सुद्धा कामात दिरंगाई होताना दिसत आहे या संबंधी शिवप्रेमी मित्र मंडळ तर्फे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली मुख्याधिकारी यांनी सुद्धा ठेकेदाराला बोलावून तात्काळ काम पूर्ण करण्याची तंबी दिली अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सुद्धा मुख्याधिकारी यांनी ठेकेदारास सर्व शिव प्रेमी च्या समोर सांगितले.

सर्व शिवप्रेमींनी काम तात्काळ सुरू करून पूर्णत्वास नेण्यात यावे किंवा पूर्वस्थितीत महाराजांचा विधिवत पुतळा स्थापनेस शहरवासियांना परवानगी देण्यात यावी .. किंवा नियमावलीत ठरल्याप्रमाणे काम चालू करण्यात यावे अन्यथा शहरवासीयांच्या वतीने कठोर पावले उचलली जातील असा इशाराही देण्यात आला.