Top News

जि. प. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावरुन नाव हटवा #Jivati

ठिय्या आंदोलनाचा गावातील नागरिकांनी दिला इशारा
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- तालुक्यातील पंचायत समिती जिवती बिट केंद्र पाटण अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माथाडी येथील प्रकरण चिघळण्याच्या अंदाज लावला जात आहे? शासनाच्या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर माथाडी गावातील रहिवासी शिवाजी श्रीरामे या व्यक्तीच नाव लिहून असल्याने गावातील काही नागरिकांनी संताप व्यक्त केला असुन मुख्य प्रवेशद्वारावरील नाव हटवण्यात यावे अशी मागणी माथाडी येथील रहिवासी माधव सागरे,दगडू श्रीरामे, रमेश आडे यांनी दिनांक ९ फेब्रुवारी रोजी संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती जिवती व ग्राम सचिव ग्रामपंचायत मरकागोंदी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली होती परंतु संबंधित विभागाने निवेदनाची दखल घेतली नसल्याने दिनांक २५ फेब्रुवारी रोजी तक्रारदाराने ठिय्या आंदोलन करण्यात येईल असे निवेदन दिले.
🎉
जि.प.उच्च प्राथमीक शाळा माथाडी येथील मुख्य प्रवेशद्वारावरील नाव हटवण्यात यावे संबंधित व्यक्तीवर चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी.शाळेच्या आवारात विद्यार्थी जेवण करण्याकरिता शेड उभारण्यासाठी खड्डे खोदून ठेवलेले आहे एक महिन्याच्या वर झाले आहे बांधकाम सुरू झालेला नाही. कोरोना महामारी मुळे शाळा बंद होते आता हल्ली शाळा सुरू झाले आहे.धडे गिरवायला विद्यार्थी शाळेत येत आहे.खोदकाम केलेल्या खड्ड्यात पडून विद्यार्थ्याचा जिव गेला किंवा इतर दुखापत झाली तर याची जबाबदारी कोण घेणार असे आरोप सुध्दा तक्रारदाराने केला आहे.त्वरीत बांधकाम सुरू करण्यात यावे अन्यथा खड्डे बुजविण्यात यावे.
🎉
संबधित कंत्राटदारांवर व मुख्य प्रवेशद्वारावरील नाव त्वरीत हटवण्यात यावे दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा दिनांक ३ मार्च २०२२ रोजी जिल्हा परिषद शाळा माथाडीच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर गावकरी ठिय्या आंदोलन करण्यात येईल अश्या मागणी चे निवेदन मा.तहसीलदार, संवर्ग विकास अधिकारी, ठाणेदार पो.स्टे.पिट्टीगुडा, ग्रामसेवक मरकागोंदी, मुख्यद्यापक जि.प.शाळा माथाडी यांना निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने