मनसे महीला सेना शहर उपाध्यक्ष वाणी सदालावार यांची महाकाली कॉलरी सि जि एम साहेब यांना निवेदनाद्वारे मागणी
चंद्रपूर:- महाकाली कॉलरी चंद्रपुर येथिल कॅन्टींग चौक ते कपिल चौक बायपास रोड व एल,सि,एच मायनस बि, टाईप ऐ, टाईप कॉर्टर्स पर्यंत बऱ्याच वर्षापुर्वी डांबरीकरण रोड बनविण्यात आले असुन त्या रोडला पुर्ण पणे जागो जागी खड्डे पडलेले असुन त्या पडलेल्या खड्ड्यांमुळे येणार जाणारे लोकांना जिवाची कसरत करावी लागत आहे. कधी अपघात घडेल व जिवीत हानी होईल हे सांगता येत नाही, म्हणुन सदर संपुर्ण रोडचे सिंमेन्ट करण व डांबरी करण रूंदीकरण करण्यात यावे.
एल, सि ,एच ,मायनस कॉर्टर्स बि टाईप ऐ टाईप कॉर्टर्स चे स्ट्रीट लाईट पुर्ण पने बंद आहे आनी मुख्य रास्ते चे ही स्ट्रीट लाईट बंद आहे तरी या समस्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही मागणी पूर्ण करावे अन्यथा मनसे स्टाईल ने आंदोलन करण्यात येणार असा इशारा देखील मनसे महिला शहर उपाध्यक्ष वानीत सदालावार यांनी निवेदन जि एम साहेबांना देण्यात आला. दिलीप रामेडवार जिल्हा अध्यक्ष, राहुल बालमवार जिल्हा अध्यक्ष मनविसे यांच्या मार्गदर्शनात देण्यात आला.
यावेळेस किशोर मडगूलवार मनसे जिल्हा सचिव, शोभा वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष, कुलदीप चंदनखेडे जिल्हा उपाध्यक्ष मनविसे, क्रिष्णा गुप्ता, मनोज तांबेकर, सचिन भाळस्कर, शंकर भडके, राजु येरले अनुरोज रायपुरे, राजु देवानगन, वर्षा भोगले, प्रमोद मेश्राम, तसेच पदाधिकारी व मनसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.