भाजपा महानगर तर्फे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना आदरांजली #chandrapur

चंद्रपूर:- स्वातंत्राविर सांवरकरांचे जिवन सर्वांना प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सहभाग आणि सशस्त्रा क्रांतीकारकांना त्यांनी दिलेली प्रेरणा यामुळे त्यांना क्रांतीकारकाचे मुकुटमनी म्हणुण संबोधले जाते. देशासाठी त्यांनी केलेला त्याग आणि सोसलेला कारावास अभुतपूर्व असा आहे. त्यांच्या जिवनापासुन प्रेरणा घेऊन आमच्यासारखे अनेक विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. सावरकरांनी अर्धे अधिक आयुष्य तुरूंगवास व स्थानबध्दतेत देशासाठी घालवले, अंदमान निकोबार मध्ये मरन यातना सोसल्या असे हे सावरकर व त्यांचे कुटुंब युवकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या पूण्यतिथी निमित्य अभिवादन करतांना आजच्या युवकांनी सावरकरापासुन राष्ट्रभक्तीची प्रेरणा घ्यावी असे मत स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंच चे रत्नाकर जैन यांनी सावरकर पूण्यतिथी निमित्त भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर तर्फे आयोजीत अभिवादन कार्यक्रमात केले. याप्रसंगी माजी उपमहापैर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, मनपा सभागृह नेता देवानंद वाढई, भाजपा महामंत्री रवी गुरणुले, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष राजु घरोटे यांचे प्रमुख उपस्थिती होती.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे म्हणुनच त्यांच्याप्रति आदर व्यक्त करण्यासाठी आम्ही ईथे एकत्र येत असतो, त्यांनी देशाच्या बाहेर इंग्लंड मध्ये असतांनाही देशासाठी लढा दिला. विद्यार्थी, युवा व जेष्ठ अवस्थेतही त्यंानी हा लढा सोडला नाही व त्यांनी देशभक्तीचा जो परिचय दिला आहे तो आम्हा सगळ्यांना प्रेरणादायी आहे. असा देशभक्त ज्यांनी कुटुंबाची संपूर्ण मालमत्ता देशासाठी लुटवीली असे जैन यांनी संबोधन केले.
स्थानीक चंद्रपूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चैक येथे पूण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. विठ्ठल डुकरे, दिनकर सोमलकर, राजेंद्र अडपेवार, सचिन कोतपल्लीवार, डाॅ. दिपक भट्टाचार्य, वंदना संतोषवार, नगरसेवक सोपान वायकर, शिलाताई चव्हाण, मायाताई उईके, शितल गुरणुले, वनीताताई डुकरे, वंदना जांभुळकर, शितल आत्राम, राजेंद्र तिवारी, मनोरंजन राॅय, प्रमोद शास्त्रकार, रवि जोगी, गणेश गेडाम, विकास खटी, पुनम तिवारी, गौतम यादव, स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंच चे गिरीष अणे, रवि येणारकर, हिंदुराष्ट्र व स्वराज फाऊंडेशनचे देवानंद साखरकर, शाम हेडाऊ, नरेंद्र लभाने, जतीन पटेल, प्रियंका पुनवटकर, चेतन पटेल, हिमांशु दहेकर, अमोल डांगे, राहुल अवताडे, राहुल सर्यवंशी, मयंक अडपेवार, सतीश तायडे यांच्या उपस्थिीतीत स्वातंत्रयविर सावरकरांच्या प्रतीमेला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत