जो तरसते है, वो गरजते है और जो गरजते है, वो बरसते नही; आ. मुनगंटीवारांचा खा. राऊतांना टोला #Mumbai

मुंबई:- राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची बुधवारी ईडीकडून चौकशी झाली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनीलॉण्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांची चौकशी आजून पुढे केली जात आहे.
यानंतर आता या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी न्यायालयाने नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर आले आहेत. एकीकडे विरोधकांनी मलिक यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मलिकांचा राजीनामा घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये संघर्ष पेटला आहे. ईडीच्या एका एका अधिकाऱ्याला बघून घेऊ, असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
याबाबत आता भाजपाचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मुनगंटीवार म्हणाले कि, जो तरसते है, वो गरजते है और जो गरजते है, वो बरसते नही, असे मुनगंटीवार म्हणाले. आयआरएस अधिकारी अशी कामे करणार नाही, त्यातही एखादा अपवाद असू शकतो. पण ईडी दावणीला बांधली गेली आहे, असा जो भास, आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो दुर्दैवी आहे. एकंदरीतच महाराष्ट्रासाठी ही बाब कदापिही योग्य नाही, असंही ते म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत