पोंभुर्णा:- पंचायत समिती पोंभुर्णा येथे सर्व महिला पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांचा स्नेहमिलन हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला यावेळी महिलांचे विविध कार्यक्रम पार पडले ज्या माध्यमातून पोंभुर्णा पंचायत समितीचा नेहमीच प्रयत्न असतो कि संधी, समानता आणि सन्मान त्यामुळे सर्वाना आपल्या रोजच्या जीवनातून 1 क्षण स्वतःला आनंद देण्याचा प्रयत्न व्यक्त होण्यासाठी संधी देऊन छोटीशी भेट देऊन कार्यक्रम आटोपला.
यावेळी कार्यक्रमला अल्का आत्राम सभापती, ज्योती बुरांडे उपसभापती, आम्रपाली खोब्रागडे वनपरीक्षेत्र अधिकारी, मासिरकर मॅडम विस्तार अधिकारी, रश्मी पुरी मॅडम कक्ष अधिकारी, शेरकी, धोंगडे पर्यवेक्षिका, तालुक्यातील सर्व महिला सरपंच, ग्रामसेवक, कर्मचारी उपस्थित होते.
पंचायत समिती पोंभुर्णा येथे सर्व महिला पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांचा स्नेहमिलन हळदी कुंकू कार्यक्रम पार #pombhurna
शनिवार, फेब्रुवारी ०५, २०२२