Top News

डॉ. अभिलाषा गावतुरे विद्यार्थ्यांसाठी आल्या धावून #Pombhurna

चेक आष्टा येथील विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास सेवा
पोंभूर्णा:- कोरोनामुळे गाव खेड्यातील गरीब विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले. दोन वर्ष शाळा बंद होती. कोरोना आटोक्यात आल्याने सरकारने शाळा चालू केल्या मात्र एसटी संपाने बस सेवा बंद असल्यामुळे खेड्यापाड्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी पंचाईत झाली. जंगल नजीक व वाघाचा वावर असलेल्या चेक आष्टा येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायदळ तर काही सायकलने प्रवास करून पोंभूर्णा येथे शिक्षण घेत असल्याचे समजल्यावर डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी पायदळ जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास सेवा दिली. प्राथमिक स्तरावर पोंभूर्णा तालुक्यातील चेक आष्टा या गावातील २० विद्यार्थ्यांसाठी ही सेवा चालू करण्यात आली आहे.
चेक आष्टा ते पोंभूर्णा या दरम्यान दाट जंगल आहे. या परिसरात मानव-वन्यजीव संघर्ष अनेक वेळा झाले.दिवसाढवळ्या सुद्धा वाघाचे वावर असल्याने प्रचंड दहशत आहे. शिवाय सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थ्यांना रोज खाजगी वाहनाने प्रवास करणे हे महाग होत असल्याने विद्यार्थी रोज भितीच्या वातावरणात पायदळ जावून शिक्षण घेत होते. चेक आष्टा येथील विद्यार्थ्यांसाठी डॉ.गावतूरे यांनी मोफत प्रवास सेवा सुरू केली आहे. त्यामुळे या गावातील विद्यार्थ्यांचा बस सुरू होत पर्यंतचा प्रवासाचा प्रश्न मिटला आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांना मोफत प्रवास सेवा सुरू करतांना श्रीकांत शेंडे, दयानंद गुरनुले, राहुल गुरनुले, रुपेश चन्नावार कालिदास कन्नाके, रोहित आदे आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने