Top News

"खोदा पहाड और निकला चुहेका छोटासा फोटो", अशी खा. राऊतांची पत्रकार परिषद:- आ. सुधीर मुनगंटीवार #pressconference #chandrapur #Maharashtra

मुंबई:- शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काही भाजपच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. यामध्ये भाजपचे नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश होता. त्यांच्या मुलींच्या लग्नात ९ कोटींचा कार्पेट वापरण्यात आला होता. त्यांची चौकशी ईडीने का नाही केली? असा सवाल संजय राऊत यांनी केला. याबाबत आ. सुधीर मुनगंटीवार बोलले की, 'जेव्हा स्वतःच्या खर्चावर बोटं ठेवला जातो, तेव्हा मनुष्य अशा पद्धतीने वागतो. या गोष्टीला सव्वा दोन अडीच वर्ष झाली आहेत आणि त्यांच्या विभागाने सर्व चौकशी करून राज्य सरकारकडे अहवाल दिला आहे. खा. राऊतांची ही पत्रकार परिषद "खोदा पहाड और निकला चूहेका छोटासा फोटो" अशी होती.'
खा. राऊतांनी काय आरोप केला?

ईडीचे अधिकारी माझ्या मुलीच्या लग्नातील मेहंदीवाल्याकडेही गेले नेलपॉलिशवाल्याकडे गेले आणि किती पैसे दिले अशी विचारपूस केली. ही आहे ईडी. काही वर्षांपूर्वी मुंबईत एका भाजप वनमंत्र्यांच्या मुलीचे लग्न झाले होते. ते वनमंत्री होते म्हणून त्यांनी लग्नात जंगलाचा सेट केला. तसेच त्यांना फील होण्यासाठी जे कार्पेट टाकले होते ते ९ कोटींचे होते. ईडीला काय ते दिसले नाही?,' असा सवाल राऊतांनी केला.
पुढे राऊत म्हणाले की, आमच्या घरात तुम्ही अशा पद्धतीने शिरताय. मुलांच्या घरात दुकानात, कामाच्या ठिकाणी शिरताय. देख लेंगे बोलताय. बघा काय बघायच आहे ते, जेलमध्ये टाकणार आहात, तर मी जायला तयार आहे.
आ. सुधीर मुनगंटीवारांचे प्रत्युत्तर

माध्यमांसोबत बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "खोदा पहाड और निकला चूहेका छोटासा फोटो", अशी संजय राऊतांची पत्रकार परिषद होती. हे गंभीरतेने घेण्याची गरज नाही. त्यांच्या पत्रकार परिषदेत नवनवीन संशोधन देतात. साधारणतः पाप केल्याने कोरोना होता, डॉक्टरपेक्षा कम्पाऊंडर मोठा, हरामखोर या शब्दाचा अर्थ नोटी आहे, असा त्यांचे संशोधन आहे. स्वतःच्या खर्चावर जेव्हा बोट ठेवले जाते, तेव्हा मनुष्य अशापद्धतीने वागतो. या गोष्टीला सव्वा, दोन अडीच वर्ष झाली आहेत आणि त्यांच्या विभागाने सर्व चौकशी करून राज्य सरकारकडे अहवाल दिला आहे.'

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने