Top News

दगडांचे गाव अन् दगडांचीच घरे, सारेकाही दगडांचेच; महाराष्ट्रात कुठे आहे हे गाव? #Stone



चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील किरमीरी हे एक छोटेसे गाव. गावाची ओळख दगडांचे गाव अशी.गावात दगडांचीच घरे, शौचालय अन जनावरांचा गोठाही दगडांचाच.कधीकाळी येथिल दगड पंचक्रोशीत लोकप्रिय होता.विटांचा घरांची फँशन आली अन येथिल दगडांची मागणी कमी झाली. मात्र आजही येथिल दगडापासून तयार केलेलं पाण्याचं टाक घराघरात दिसतयं.


जिल्ह्यातील गोंडपिपरी या मागासलेल्या तालुक्यातील किरमीरी हे छोटस गाव .वर्धा नदी पात्रापासून काही अंतरावर गाव वसलेलं आहे. एकीकडे वर्धा नदी तर दूसरीकडे डोंगर. गावात 350 ते 400 घरे आहेत. लोकसंख्या 1 हजार 300. या गावाचे वैशिष्टय म्हणजे गावातील 95 टक्के घरे दगडांनी बांधलेली आहेत. गावाला लागुनच असलेल्या डोंगरात घिसी गोटा मोठ्या प्रमाणात सापडतो. जेव्हा स्लॕबच्या घराची फॕशन नव्हती तेव्हा येथिल दगडांना मोठी मागणी होती. गावातील बहूतांश कुटूंब डोंगरातील दगड काढण्याचे काम करायचे.दगड काढणे अन विकणे हाच गावाचा मुख्य व्यवसाय झाला होता.घराचा बांधकामासाठी गोंडपिपरी तालुक्यातील बर्याच गावातून ग्राहक येथे गर्दी करायचे.

धाबा परिसरातील बहूतांश जून्या घरांचा पाया किरमीरी येथिल दगडांनीच भरलेला आहे.घर बांधकाम असो वा विहीर. दगड किरमीरीचाच असायचा. त्याप्रमाणेच किरमीरी येथिल दगडी पाण्याचे टाके प्रसिद्ध होते.या टाक्याला मोठी मागणी होती. लहान आकाराचा टाक्यापासून ते मोठे टाके येथिल गावकरी बनवायचे.आजही अनेक घरात किरमीरी येथिल दगडी टाके दिसतात. टाके बनविण्यासाठी भला मोठा दगड पोखरून काढावे लागत असे. तयार झालेले टाके बैलबंडीने ग्राहका पर्यंत पोहचविले जायचे.
गावाला लागुनच डोंगर असल्याने या गावातील नागरिकांनी याच दगडाचा वापर घर बांधकामात केला. कवेलूचे घर असो वा स्लॕब. झोपडी असो वा जनावरांचा गोठा.भिंती दगडांचाच ठरलेल्या.या गावाची दगडांशी घट्ट मैत्री असली तरी येथिल नागरिक मात्र गोड स्वभावाचे आहेत. आज दगडांची घरे फार कमी बांधली जातात. त्यामुळे दगडाला मागणी नाही. त्यामुळे काही गावकरी शेतीकडे वढलेत तर काही व्यवसाय टाकून बसलेत.काही मजूरी करून उदर्निवाह करीत आहेत. दगडावर पडणारे लोखंडी घन आता धूळ खात पडले आहेत.मात्र गावाची ओळख आजही दगडांचे गाव अशीच आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने