Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का केलेस? ‘बाल’प्रेयसीचा पारा चढला #love

15 वर्षांच्या मैत्रिणीलाच बदडलं
वर्धा:- लॉकडाऊनच्या काळात अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्याची आकडेवारी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. नकळत्या वयात होणारी प्रेम प्रकरणं, विरह, दुरावे, ब्रेक अप आणि त्यातून वाढणारी भांडणं, वादावादी आणि गुन्हेगारी.
एकीकडे थेरगावच्या पोरीची थेरं ताजी असतानाच, एका अल्पवयीन मुलीने तिच्या कथित ‘बॉयफ्रेंड’च्या मदतीने 15 वर्षीय मुलीला बदडल्याचा प्रकार समोर आला आहे. वर्धा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे. दुखापतग्रस्त मुलीवर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. माझ्या प्रियकराला मेसेज का केलेस, असं म्हणत 16 वर्षीय मुलगी आणि तिच्या कथित प्रियकराने पीडित मुलीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरु केला आहे.
काय आहे प्रकरण?

16 वर्षीय मुलीने तिच्या कथित ‘बॉयफ्रेंड’च्या मदतीने 15 वर्षीय मुलीला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना वर्धा शहरातील आयटीआय टेकडीवर घडली.
“माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का केलेस?”

15 वर्षीय मुलगी शिकवणीमध्ये बसून असताना 16 वर्षीय मुलीच्या ‘बॉयफ्रेंड’चा फोन आला. शिवीगाळ करुन धमकी देत त्याने पीडितेला आयटीआय टेकडी परिसरात बोलवले. अल्पवयीन मुलगी भीतीपोटी तिथे गेली असता तिला दुसऱ्या मुलीने शिवीगाळ केली. माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का केलेस, असे म्हणत 16 वर्षीय मुलगी आणि तिच्या कथित बॉयफ्रेंडने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तिथे उपस्थित असलेल्या तिच्या मित्र मैत्रिणींनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. पण, तरीही ती मुलगी ऐकत नव्हती. जखमी मुलीला सावंगी येथील रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
जखमी मुलीचा जबाब

घटनेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांना मिळताच त्यांनी तात्काळ रामगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. पोलिसांनी जखमी मुलीचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत