जाहिरात... Advertisement... विज्ञापन

निराधार व श्रावनबाळ योजनेचे पैसे लाभार्थ्यांना त्वरित वितरीत करा तहसीलदारांना निवेदन #ballarpur

बल्लारपूर:- दि.08 मार्च रोज मंगळवारला बल्लारपूर शहर व तालुक्यातील अनेक लाभार्थीना निराधार व श्रावनबाळ योजनेचे पैसे दोन ते तीन महिने लोटूनही अजून मिळाले नाही.
त्यामुळे त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यावर अजूनही काही उपाय योजना करण्यात आली नाही असे मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तसेच भाजयुमो जिल्हा जनसेवा कार्यालयात अनेक नागरिकांनी सुचविले यावर वेळ न गमावता भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी बल्लारपूरचे तहसीलदार श्री.संजयजी राईंचवार यांना योजनांचे पैसे त्वरित वितरित करा असे निवेदन दिले व चर्चेदरम्यान तहसीलदार साहेबांनी सुद्धा सकारात्मक माहिती देत लवकरात लवकर लाभार्थ्यांना पैसे वितरित केल्या जाईल असे सांगितले.
याप्रसंगी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष मोहित डंगोरे, युवानेते राजेश कैथवास, गणेश कुंडे यांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत