जाहिरात... Advertisement... विज्ञापन

मन उधाण यारीचे...!!

मन उधाण यारीचे...!!


        मैत्री ही अशी भावना आहे जी दोन मित्रांना अंतःकरणापासून जोडते. खरा मित्र निस्वार्थ असतो. जेव्हा त्याची गरज भासते तेव्हा तो नेहमीच मदत करतो. एक खरा मित्र नेहमी त्याच्या मित्राला योग्य गोष्टी करण्याचा सल्ला देतो. परंतु या जगात खरा मित्र मिळविणे फार कठीण आहे मात्र अशक्य नाही याची प्राचितीच जणू आज राजुरा बस स्थानकावर बघायला मिळाली.


       राजुरा येथील चेतन बाळू सातपुते नामक युवक बीड येथे कृषी विषयाचे शिक्षण घेत आहे आणि 2 वर्षाच्या लॉक डाऊन नंतर आज पहिल्यांदाच त्याला बीड येथे आपले पुढील शिक्षणास जायचे होते मात्र गेल्या 2 वर्षात जमलेली मैत्री आणि कट्ट्यावरच्या गप्पा त्याला आणि त्याच्या मित्रांना आता विसराव्या लागणार होत्या.
आपला मित्र आता आपल्या सोबत रोज नसणार या दुःखाने चेतन सहित हितेश जयपूरकर, पंकज कवठे, अनिकेत पारखी, योगेश लांडे, गोहोणे आणि इतर सर्व मित्रांच्या डोळ्यात अश्रू आणले. पण मित्र शेवटी मित्रच चेतन चा हसत खेळत सार करण्यासाठी त्याच्या मित्रांनी चक्क हार आणि फुलांनी त्याला बिदाई दिली एवढंच नव्हे तर ज्या एस टी बस ने चेतन प्रवास करणार होता त्या एस टी बस ला ही हार फुल घालून पूजा केली व चालक व वाहक यांना सावधानतेने गाडी न्या "आमचा जीव की प्राण असलेला मित्र या गाडीत आहे" अशी विनंती सुद्धा केली.
       असा हा घट्ट मैत्रीचा प्रसंग आज राजुरा बस स्थानकावर सर्व प्रवाश्यांना बघायला मिळाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत