Top News

कळमगाव (गन्ना) येथिल बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कायम ठेवा #BankofMaharashtra

खातेदार व परिसरातील जनतेची मागणी
सिंदेवाही:- तालुक्यातील मौजा कळमगाव (गन्ना) येथे सन 1989 पासून जनतेच्या सेवेकरिता बँक ऑफ महाराष्ट्र ची शाखा कार्यरत आहे. सदर शाखेत आर्थिक व्यवहार करणारे हजारोंच्या संख्येने खातेदार असून आजतागायत सदर शाखा ही जनतेच्या सेवेत अविरत सेवा देत आहे. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपर्वी सदर बँकेच्या व्यवस्थापनाने कळमगाव (गन्ना) येथील शाखा बंद करून त्या शाखेचे संपूर्ण व्यवहार सिंदेवाही शाखेतून करावे असे पत्र प्राप्त झाल्याची माहिती मिळताच बँकेच्या शाखा बंद च्या धोरणाने परिसरातील 16 गावे प्रभावित होणार आहे. तसेच सदर बँकेच्या हजारोंच्या संख्येत असलेले खातेदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार असून कळमगाव (गन्ना) येथील शाखा कायम ठेवावी अशी मागणी करणारे निवेदन परिसरातील सोळा गावच्या नागरिकांनी क्षेत्रीय प्रबांधकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
आजच्या युगात मानवाने यंत्राच्या सहाय्याने मंगळापर्यंत पचण्याची प्रगती केली आहे. तर देश पातळीवर डिजिटल सेवांच्या माध्यमातून आज संपूर्ण देशात आंतर जाळे पसरवून विविध सेवांसह मानव वस्त्या जोडले गेले आहेत. अशातच एकीकडे आर्थिक व्यवहारा करिता देशातील राष्ट्रीयीकृत बँकांनी ग्रामीण स्तरावरील नागरिकांकरिता विविध खेडोपाडी आपल्या शाखा उघडून नागरिकांना सेवा देण्याचे प्रयत्न चालविले. अशातच सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव गन्ना येथे सन 1989 ला बँक ऑफ महाराष्ट्र शाखा उघडण्यात आले. सदर शाखे अंतर्गत कळंमगाव (गन्ना), कळमगाव ( तुकूम), पेट गाव, वि रवा, इटोली, बामनी बामणे मोहाडी ,नलेश्वर ,पांगडी, जमसळा ,मुरमाडी, चारगाव ,कोठा (मुरमाडी) आदी गावांतील नागरिकांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी शाखा कार्यरत होती.
मात्र गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी सदर शाखेला शाखा बंद करण्याचे पत्र मिळाल्याची माहिती तेथील शाखेतून मिळालेली असून कळमगाव गन्ना शाखेचे संपूर्ण आर्थिक व्यवहार हे शिंदेवाही शाखेतून करण्यात येणार असल्याची माहिती नागरिकांना बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापनाने घेतलेल्या सदर निर्णयामुळे शाखेत स्थापनेपासून सुरू असलेले हजारो संख्येने असलेल्या खातेदारांचे आर्थिक व्यवहार आता सिंदेवाही शाखेतून करावे लागणार यामुळे सदर बँक शाखे परिसरातील सोळा गावातील शेतकरी शेतमजूर व्यापारी कर्मचारी तसेच शासकीय कार्यालय ग्रामपंचायत शाळा आधी खातेदारांना बँक व्यवस्थापनाच्या या कठोर निर्णयाचा फटका बसणार असून परिसरातील वयोवृद्ध तसेच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी यांना सदर निर्णयाचा चांगलाच त्रास होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहे.
या सदर्भात परिसरातील गावकऱ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापनाने घेतलेला निर्णय मागे घेऊन कळमगाव गन्ना येथील शाखा कायम ठेवावी अशा मागणीचे निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार जिल्हाधिकारी चंद्रपूर, तसेच क्षेत्रीय व्यवस्थापक तथा महाप्रबंधक यांना निवेदनातून केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने