Top News

भद्रावतीत जागतिक जल दिन साजरा #bhadrawati


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करुन भद्रावतीत नुकताच जागतिक जल दिन साजरा करण्यात आला. यावेळी जलदिनाचे औचित्य साधून शहरातील भूजल पातळीची मागील काही वर्षात झालेली दुरावस्था बघता इको-प्रो तर्फे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
भद्रावती शहरात व शहराच्या सभोवताल मोठ्या प्रमाणात तलावे, बोड्या व विहिरी आहेत. ज्यामुळे मागील काही वर्षां पर्यंत शहरातील भूजल पातळी बऱ्याच प्रमाणात टिकून राहिली. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे व औद्योगिकीकरणामुळे तलावांची व विहिरींची संख्या कमी होत चालली आहे. परिणामी शहरातील भूजल पातळी अतिशय खालावली आहे. त्यात आणखी भर म्हणून शहारालगत असलेल्या तलावांचे नागरी वस्त्यांमध्ये रूपांतर होत आहे. काही शासकीय तलावांवर नागरी अतिक्रमण झाले आहेत. तर काही हेतुपुरस्पर विकल्या गेले आहेत. त्यातीलच एक भाग म्हणून शहराच्या मधोमध असलेल्या कुंभारबोळी चे ले आउट मधे रूपांतर करण्याचे काम सूरू झाले. महत्वाचा भाग म्हणजे नगरपालिकेच्या,"ब्लू झोन " मधे हि बोळी असतांना मालकाने बेकायदेशीररित्या ही बोडी बुजविण्याचे कृत्य केले. त्या घटनेचा निषेध म्हणून आज दि. २२ मार्च ला जागतिक जल दिनाचे औचित्य साधून याच बोळी परिसरात जनजागृती कार्यक्रमा द्वारे स्थानिकांना पाण्याचे महत्व पटवून देण्यात आले.
सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना या प्रभागाचे नगरसेवक मा. सुधीर सातपुते यांनी हे कृत्य निंदनीय असून असे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यावर कठोर कारवाही करण्याची मागणी केली व जेव्हा केव्हा या बोळी चा प्रस्ताव नगरपालिकेत मंजुरीस येईल तेव्हा त्या प्रस्तावाला कडडून विरोध करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. शहरातील तलावांसह विहिरींचे जतन व संवर्धन होणे गरजेजे असल्याचे ते म्हणाले. त्या करिता खाजगी मालकीची तलावे नगर प्रशासनाने हस्तगत करून त्या तलावांचे शुशोभीकरण करावे व यातील पाणी वर्षभर टिकून राहील याची नगर प्रशासना सोबत नागरिकांनीही काळजी घ्यावी असे ते म्हणाले. शहरातील तलावे आणि बोळ्या वाचविण्याचा इको-प्रो च्या या मोहिमेचे त्यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीत सोबत राहायचे आश्वासन दिले.
इको-प्रो च्या या मोहिमेत सर्व नागरिकांनी तन, मन धनाने सहकार्य करावे व पर्यावरण रक्षणाच्या या मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभागी होवून संघटनेचे मनोबल मजबूत करण्याचे आवाहन संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप जीवने यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक अमोल दौलतकर यांनी केले. तर आभार किशोर खंडाळकर यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता हनुमान घोटेकर, दिपक कावठी, शुभम मेश्राम, मंगेश पढाल यांनी पारिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने