Top News

ना. बच्चू कडू यांचे त्यांच्या जगावेगळ्या प्रेरणादायी कार्याचे पुन्हा एकदा कौतुक #help

सालनापूर येथील दिव्यांगाच्या मुलीच्या लग्नासाठी एका फोनवर केली मदत
धामणगाव रेल्वे,ता. :- जन्मदात्या आईला देवाज्ञा झाल्यानंतर शोकाकुल असताना व स्वतःच्या कुटुंबियांना व आप्तस्वकीयांना वेळ देणे गरजेचे असतांना निराधार दिव्यांगांना त्यांच्या दुःखात मदत करणाऱ्या राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तालुक्यातील सालनापूर येथील एका अपंग परिवाराला मदत करून पुन्हा एकदा मानवतेचा परिचय दिला आहे.दरम्यान जन्मदात्या आईच्या जाण्याचे दुःख सोबत ठेऊन अंध,अपंग कुटुंबाच्या मदतीला धावून येणाऱ्या बच्चू कडू यांचे त्यांच्या जगावेगळ्या सेवाभावी व प्रेरणादायी कार्याचे पुन्हा एकदा कौतुक होत आहे.
नुकतेच राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आई इंदिराबाई कडू यांचे निधन झाले. त्यामुळे कौटुंबिक दुःखात असलेले बच्चू कडू गावातच सामाजिक कार्यक्रम राबवून आरोग्य तपासणी,शस्त्रक्रिया व रक्तदान शिबिरं घेऊन गरजू गोरगरिबांना मदतीचा हात देत आहेत.गावातील झाडांना रंगवून त्यांनी समाजाला दिशा दर्शवणारी अनोखी होळी साजरी केली. विविध सामाजिक कार्यक्रम राबवित असतांना आईच्या हट्टापायी आज(२४मार्च) रोजी त्यांना आई इंदिराबाई यांच्या तेरावीचा कार्यक्रम सुद्धा घ्याव लागत आहे.मात्र कुटूंबातील जबाबदरीच्या व्यस्त वेळेतही स्वतः मातृशोकात असतांनाही बच्चूकडू यांना तालुक्यातील सालनापूर या गावात राहणाऱ्या डोळ्यांनी पूर्णतः अंध दिव्यांग असलेल्या संजय ठाकरे यांनी कॉल केला व माझ्या मुलीचे लग्न आहे भाऊ आपली मदत हवी आहे. ही विनंती केली.समाजासाठी धावून जाणाऱ्या ध्येयवेड्या बच्चू कडू यांनी त्यांच्या विनंतीला हाक देत लगेच प्रहारचे जिल्हा प्रमुख प्रवीण हेंडवे यांच्याकडून संजय ठाकरे यांच्याबद्दल माहिती मागवली असता संजय व त्याची पत्नी दोघेही दृष्टीहीन आहेत.घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून (२३ मार्च रोजी) त्याच्या मुलीचे लग्न असल्याने संजय आर्थिक अडचणीत असल्याची माहिती मिळाली.बच्चू कडू यांनी तात्काळ प्रहार प्रमुख प्रवीण हेंडवे व कार्यकर्त्यांना मदत करण्यासाठी सूचना केली असता जिल्हा प्रमुख प्रवीण हेंडवे,अमर ठाकरे व अक्षय धोपटे गजानन डाफ,अमर ठाकरे,प्रशांत हुडे,शैलेश टाले, अनूप भोगे,प्रवीण रोहनकर,प्रशांत थोटे,सूरज वानखड़े,सूरज गंथड़े यांनी संजय ठाकरे यांना त्यांच्या कार्यात खारीचा वाटा म्हणून स्व. इंदिराबाई कडू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १० हजार रुपयांची तातडीची मदत करण्यात आली व २३ मार्च रोजी संजयच्या मुलीचे लग्न लागले.जन्मदात्या आईच्या जाण्याचे दुःख सोबत ठेऊन अंध अपंग कुटुंबाच्या मदतीला धावून येणाऱ्या बच्चूकडू यांचे त्यांच्या जगावेगळ्या विधायक कार्याचे पुन्हा एकदा कौतुक होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने