घुग्घुस भाजपा तर्फे महाप्रबंधक उदय कावळे यांचा सत्कार #chandrapur

Bhairav Diwase
उदय कावळे साहेब हे चंद्रपूर जिल्ह्याचे भूषण:- देवराव भोंगळे
चंद्रपूर:- वेकोलि वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे यांचा घुग्घुस भाजपातर्फे सत्कार करण्यात आला. वेकोलि वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे यांची नुकतीच भारत कोकिंग कोल लिमिटेडच्या तांत्रिक निर्देशक पदी निवड करण्यात आली त्याअनुषंगाने घुग्घुस भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली व शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले वेकोलि वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे हे चंद्रपूर जिल्ह्याचे भूषण आहे त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे नाव लौकिक केले आहे. भारत कोकिंग कोल लिमिटेडच्या तांत्रिक निर्देशक पदी उदय कावळे यांची निवड झाल्याने चंद्रपूर जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. त्यांच्या कार्यकाळात वेकोलि वणी क्षेत्राच्या कोळसा खाणीचे कोळश्याचे विक्रमी उत्पादन झाले त्यांनी नवा कीर्तिमान केला आहे.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी सरपंच संतोष नुने, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, साजन गोहने, भाजपाचे शाम आगदारी, अनंता बहादे, प्रवीण सोदारी, बबलू सातपुते,निरंजन डंभारे, तुलसीदास ढवस, मानस सिंग, विजय माथणकर उपस्थित होते.