Top News

आ. खोपडेंवर गुन्हा दाखल करा #bhadrawati

युवा सेनेची मागणी
भद्रावती:- नागपूरचे भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या बद्दल निंदनीय वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे आणि निलेश बेलखेडे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्याकडे केली आहे.
निवेदनात आ. कृष्णा खोपडे यांनी दि.२६ फेब्रुवारी रोजी माध्यमांवर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या बद्दल नालायक व बेशरम मुख्यमंत्री पाहिला नाही,असे वक्तव्य करून तमाम जनतेचा व शिवसैनिकांचा अपमान केला आहे असे नमुद करण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशीही मागणी हर्षल शिंदे आणि निलेश बेलखेडे यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने