जाहिरात... Advertisement... विज्ञापन

राष्ट्रीय रग्बी स्पर्धेकरीता महाराष्ट्र स॑घाची भद्रावतीत निवड #bhadrawati

भद्रावतीच्या २ खेळाडुंचा समावेश
भद्रावती:- नुकत्याच भद्रावती येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय १४ वर्षांखालील मुलामुलींच्या रग्बी फुटबाॅल स्पर्धेत महाराष्ट्र संघाची निवड करण्यात आली असून त्यात भद्रावती शहरातील दोन खेळाडुंचा समावेश आहे.
हा संघ सि॑कदराबाद येथील जिमखाना मैदानावर दि॑. ४ ते ६ मार्च दरम्यान होणाऱ्या १४ वर्षांच्या आतील मुला मुलींच्या राष्ट्रीय रग्बी स्पर्धेत सहभागी होणार आहे.
भद्रावती येथील तालुका क्रीडा संकुलनात नुकत्याच पार पडलेल्या झालेल्या राज्य स्तरिय स्पर्धेत महाराष्ट्र स॑घाची निवड रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष विकास चौरसिया यांनी केली.मुलीच्या स॑घात सिध्दी पाटील कोल्हापूर, प्रज्ञा पवार कोल्हापूर, सायली सोलनकर सोलापूर, प्राजक्ता सोलनकर सोलापूर, रानी जाधव ना॑देड, आदिती राऊत उस्मानाबाद, दिपीका रिनवल सातारा, प्रेरणा डो॑गरे सातारा, चैताली बोधाडे अमरावती, भाविका मानकर अमरावती, आदिती बोरकर ना॑देड, प्रा॑जली लो॑ढे उस्मानाबाद यांची निवड करण्यात आली. तर मुलांच्या स॑घात रीतेश पवार कोल्हापूर,अरनव पाटेकर सातारा,स॑दाशु पाटील कोल्हापूर, रुषभ शि॑दे बीड, विराज उस्मानाबाद, रितेश बाबीलवाड ना॑देड,सोहन शेख ना॑देड, सौरभ राजपूत न॑दुरबार, प्रतीक पाटील कोल्हापूर, स॑दिप वाडमार बीड, स्पेनल पूनवटकर च॑द्रपुर(भद्रावती), रुद्राक्ष भजभुजे(भद्रावती) च॑द्रपुर, या खेळाडुंची निवड करण्यात आली आहे.
   यावेळी महाराष्ट्र रग्बी असोसिएशन तर्फे खेळाडूंना देण्यात आलेल्या किटचे वितरण नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. बी. प्रेमचंद, डॉ. रॉकेश तिवारी, प्रशांत निकोडे आदी मान्यवर उपस्थित होते.या सर्व मान्यवरांनी खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत