काकबन, पेद्दाआसापूर ते घनपठार रोडचे काम मंजूर करून तात्काळ सुरू करा:-सुदाम राठोड

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुक्यातील अति डोंगराळ भागातील सामान्य जनतेला काकबन ते पेद्दाआसापूर व घनपठार या गावी येण्या-जाण्यासाठी खूप मोठ्या डोंगरातून जावे लागते.
घनपठार वरून शेणगाव हे गाव 3 की.मी. अंतरावर आहे या शेणगाव या गावामध्ये उच्च शिक्षणची सोय आहे म्हणून पेद्दाआसापूर येथील विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी शेणगाव येथे जाऊन शिक्षण घेत आहेत,या विद्यार्थ्यांची व सर्व सामान्य जनतेची मागणीची गांभीर्याने लक्ष घेऊन तात्काळ रोड चे सर्वे करून रोडाच्या कामाला सुरुवात करावी असे मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदनाद्वारे जय विदर्भ पार्टीचे नेते सुदमभाऊ राठोड यांनी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग गडचांदूर यांच्या मार्फत देण्यात आले.
यावेळी सोशल मीडिया प्रमुख विशाल राठोड, युवा तालुकाध्यक्ष रामेश्वर पोले, तालुकाध्यक्ष रियाज सय्यद, शहर प्रमुख विनोद पवार, सचिन पवार उपस्थित होते. आमची मागणी पूर्ण न झाल्यास जय विदर्भ पार्टी तीव्र आंदोलन करेल असा इशारा सुदमभाऊ राठोड यांनी दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत