कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या #Suicide

Bhairav Diwase
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- नापिकी आणि कर्जबाजारी पणाला कंटाळून कढोली (बू) येथील शेतकरी सुदर्शन बापूजी बोबडे (४५)यांनी शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली.
राजुरा तालुक्यातील कढोली (बू) येथील शेतकरी सुदर्शन बापूजी बोबडे हे गेल्या तीन-चार वर्षांपासून गुलाबी बोंड अळीमुळे नापीकी आणि कर्जबाजारीपणामुळे त्रस्त होते. कर्जाचा डोंगर आणि नापिकी यामुळे त्यांनी राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. तातडीने त्यांना कढोली (बू) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्याने शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांचेवर स्टेट बँक ऑफ इंडियाचे १ लाख रुपये आणि सेवा सहकारी पतसंस्था कढोली बु १ लाख रुपये,बळीराजा सेवा सहकारी संस्था 1 लाख 50 हजार असे मिळून 3 लाख 50 हजार रुपयाचे कर्ज असल्याची माहिती आहे. त्यामुळे ते गेल्या अनेक दिवसापासून निराशेने ग्रस्त होते. घरी कुणी नसल्याची संधी साधून त्यांनी विष प्राशन केल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.