पोलीस तपासा अंती आरोग्यसेविकेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैदकीय अधिकारी यांनी उपकेंद्र केकेझरी येथे कार्यरत असलेल्या आरोग्यसेविकेचा विनयभंग केल्याची तक्रार जिवती पोलीस ठाण्यात दाखल झाली असून या तक्रारी वरून पोलीस पुढील तपास करत असता त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक महिला पोलीस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे यांनी शुक्रवारी दिवसभर तपास करून वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास अनकाडे यांच्यावर आरोग्यसेविकेच्या विनयभंगं केल्याप्रकारणी गुन्हा दाखल केला आहे.
वैदकीय अधिकारी डॉ. रामदास अनकाडे हे मासिक सभा व इतर सभा करताना कर्मचाऱ्या समोर अपमान करत असतो. तसेच फोन करून दवाखान्यात बोलावतो त्याच्या कबीन मध्ये गेले असता वाईट नजरेनं बगतो असलील भाषा वापरतो मानसिक छळ करतो 2 मार्च 2022 रोजी डॉ. रामदास यांनी मला आपल्या रूमवर बोलावून शरीर सुखाची मागणी केली असे ही आरोग्यसेविकेने तक्रारीत म्हटले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत