गडचिरोली नवेगाव रॊड कॉम्प्लेक्स जवळ स्कूल बस आणि ट्रक अपघात


गडचिरोली:- गडचिरोली शहरापासून जवळच असलेल्या नवेगाव परिसरात आज दुपारी एक वाजेच्या दरम्यान एक मालवाहू ट्रक ने, पंचर अवस्थेत उभी असलेल्या स्कूल बस ला मागून जोरदार धडक दिल्याने 12 विद्यार्थी सह आणि स्कूल बस चे चालक, आणि वाहक जखमी झाले आहे. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 2 मुलांच्या डोक्याला जबर मार लागलेला होता. या अपघातात ट्रक वाहनाने स्कूल बसला जोरदार धडक दिल्याने स्कूल बस पुढे जाऊन रोडच्या बाजूने चालत आलेल्या एका सायकलस्वार व्यक्तीला धडकून त्या व्यक्तीला गंभीर जखमी केले आहे.
ट्रक वाहन चा चालक गर्दीचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला होता. या अपघाताची भीषणता एवढी मोठी होती की, स्कूल बस ला धडक दिल्याने स्कूल बस रस्त्याच्या मधोमध दुभाजकावर पलटली होती. या अपघातात ट्रक वाहनाने स्कूल बस ला धडक दिल्यानंतर वीज खांबाला जोरदार धडक दिली होती. तसेच तो वीज खांब पूर्णपणे वाकून गेला होता.
या अपघातामुळे वीज विभागाचे जवळपास 25 हजाराचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच वीज विभागाचे अधिकारी आणि पोलिस यंत्रणा घटनास्थळी पोहचलेली होती. घटनास्थळचा पंचनामा करून स्कूल बसच्या जखमी वाहक आणि चालकाला सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत