ग्रामपंचयतीची वेळ काय रं भाऊ? #Grampanchayat

Bhairav Diwase
कार्यालयीन वेळेअगोदर कर्मचारी गायब: गावातील नागरिक त्रस्त
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) सौरभ चौधरी, सावली
सावली:- सावली तालुक्यातील मौजा गेवरा बुज येथील ग्रामपंचायत कार्यालयात कर्मचारी वेळा पाळत नसल्याने गावकरींना सातत्याने अड़चन होत आहे. ग्रामपंचयतीचा कार्यालयीन वेळ सकाळी १० ते ५ असा आहे.मात्र ग्रामपंचायत कधी २ ला तर कधी ४ लाच बंद असते.
ग्रामपंचयत कार्यालयात वेळा पाळाल्या जात नसल्याने नागरिकांच्या कामकाजावर परिणाम होत आहे .विशेषत: कोणत्याही शासकीय कार्यालयात कामकाजाची वेळ ठरलेली असते.या वेळेत किमान कर्मचारी उपलब्ध असतात.त्यामुळे नागरिकांची कामे होतात.या ग्राम पंचायत कार्यालयात मात्र यापेक्षा निराळी परिस्थिति आहे. ग्राम पंचायत कार्यालय केव्हाही उघडते व केव्हाही बंद केले जाते. कधी कधी तर ग्रामसेवक नाहीत या सबबीखाली कार्यालय उघडलेच जात नाही. त्यामुळे आज कार्यालय उघडे आहे का? अशी विचारणा नागरिकांकडून होत आहे.
गावचा कारभार हा सरपंच व त्या ग्रामपंचयतीच्या सचिवांवर हाकला जातो. मात्र ग्रामसेवकच नसल्याने ग्रामपंचयत कार्यालय केवळ दोन तास उघडे राहत असल्याचे चित्र तालुक्यातील बहुतांश गावात आहे.
जास्त लोकसंख्या असलेल्या गावातही सकाळी १० ते २ या वेळेतच ग्रामपंचयतीचे काम सुरु असते. दुपारी २ नंतर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत कार्यालय बंद होतात.
जिल्हा परिषदेत जायचे आहे,पंचायत समितिमधे काम आहे,वरच्या साहेबांनी बोलावलय आहे.असे सांगून ग्रामसेवक निघुन जातात. यामुळे ग्रामसेवकांकडे असलेल्या छोट्या मोठ्या कामामुळे ग्रामस्थ हैरान झाले आहेत.
विशेष बाब म्हणजे ग्रामपंचयतीच्या ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याचे वरिष्ठांचे आदेश असून ते दररोज 50 किमी.अंतरावरुन ये-जा करतात घरी परतन्यासाठी उशीर होऊ नये म्हणून ते कार्यालयीन वेळेअगोदर निघुन जातात.