Top News

चेक ठाणा येथे वित्तीय साक्षरता अभियान संपन्न #chandrapur #pombhurna



पोंभुर्णा:- क्रिसिल फौंडेशन मनिवाईज वित्तीय साक्षरता केंद्र पोंभुर्णा यांच्या विद्यमाने व ग्राम पंचायत कार्यालय चेक ठाणा यांच्या पुढाकाराने गावात वित्तीय साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने गावात वित्तीय साक्षरता जनजागृती व लिंकेज कॅम्प चे आयोजन करण्यात आले. यात शासनाच्या विविध सामाजिक सुरक्षा योजना विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच बँकिंग व्यवहार, मोबाईल बँकिंग व डिजिटल व्यवहार,इ.वित्तीय साक्षरता संबंधी विषयावर मनिवाईज वित्तीय साक्षरता केंद्र पोंभुर्णा चे केंद्र व्यवस्थापक भिमराज चांदेकर यांनी मौलाचे मार्गदर्शन केले तसेच क्षेत्र समन्वयक भावेश पोलोजवर यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच शासनाच्या विविध योजनेशी बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून 31 लिंकेज करण्यात आले.
सदर वित्तीय साक्षरता अभियानाला बँक प्रतिनिधी झाडे ग्राम पंचायत चेक ठाणा चे सरपंच सौ कुळमेथे, उपसरपंच शिंदे, सचिव येरोज्वार, ग्रा.पं. सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. विशेष म्हणजे गेल्या महिनाभरापासून मनिवाईज वित्तीय साक्षरता केंद्र पोंभुर्णा तर्फे विविध क्षेत्र कार्याच्या माध्यमातून गावात वित्तीय साक्षरता संबंधी जनजागृती करण्याचे काम निःशुल्क सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने