Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

सहनशीलतेचा उद्रेक. Chandrapur

नितिन भटारकर यांनी केली कार्यालयाची तोडफोड.
चंद्रपूर:- दुर्गापूर, नेरी, कोंडी या परिसरात मागच्या काही कालावधीत तब्बल १३ सर्वसामान्य नागरिकांचा बळी गेला.
या हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करा या मागणीकरिता वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी तब्बल ६ दिवस आमरण उपोषण केले होते. त्यानंतर प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर भटारकर यांनी उपोषण मागे घेतले परंतु उपोषणा वेळी दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यानेच कालची दुर्दैवी घटना घडली असा भटारकर यांनी आरोप केला.
वनविभाग, सीटीपिएस व डब्ल्यू.सी.एल प्रशासनाला नितिन भटारकर यांनी वारंवार निवेदन देऊनही दुर्लक्ष केलं. वन विभागाला निवेदन दिल्यानंतर वन विभागाने सिटीपीस प्रशासन व WCL प्रशासनाला त्यांच्या हद्दीतील परिसर असलेल्या ठिकाणांची तात्काळ साफसफाई करण्यासंदर्भात निर्देश दिले होते.
वन विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र प्रशासनाने वाघ व बिबट करीता अनुकूल असलेल्या झाडझुडपांची साफ सफाई केली असल्यानेच या हिंस्र प्राण्यांनी ती जागा सोडली. त्याच प्रमाणे डब्ल्यू. सी. एल. ने सुद्धा त्यांच्या उपयोगात नसलेल्या जागेची साफसफाई करावं ही मागणी वारंवार केली होती. WCL ने त्याच्या जागेची साफसफाई केली असती तर कदाचित कालची दुर्दैवी घटना घडली नसती.
वनविभागाने सुचवलेल्या उपाययोजना व निर्देशाला घेऊन WCL प्रशासनाला अनेकदा निवेदन दिले, त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी दिनांक १२ मार्च २०२२ ला सुद्धा विभागीय व्यवस्थापक श्री. लाखे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले होते. परंतु त्यानंतरही त्यांनी त्यांच्या जागेची साफसफाई करण्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांना वारंवार भेटून सुद्धा दुर्लक्ष केल्यामुळेच काल डब्ल्यू.सी.एल. च्या जागेवर वाढलेल्या झुडपी जंगलामुळे एका निष्पाप प्रतीक बावणे या ८ वर्षाच्या मुलाचा बळी गेला.
एवढ्या दुर्दैवी घटनेनंतर काल नितिन भटारकर यांनी व्यवस्थापकाला सकाळी भेटा अशी विनंती केल्यानंतर सुद्धा आज वारंवार संपर्क साधूनही मुद्दाम वेळ दिला नसून आजही टाळण्याचा प्रकार केला.
त्याचमुळे या असंवेदनशील व सुस्त झालेल्या प्रशासनाला जाग करण्याकरिता नाईलाजास्तव नितीन भटारकर यांना उद्रेक आंदोलन करावे लागले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत