थेट काळीपिवळी गेली तलावात #chandrapur #Mul

Bhairav Diwase

मुल:- आपण नेहमी अपघाताच्या घटना बघतो आणि वाचतो पण मुल तालुक्यात एक विचित्र घटना पाहावयास मिळली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुल शहरात सिंदेवाही-मुल लोकल चालणारी काळीपिवळी ही नेहमीप्रमाणे तलावाच्या पायथ्याशी गाडी भरायला उभी होती. बऱ्याच प्रमाणात पॅसेंजर सुद्धा गाडीत बसले होते. त्यात काही लहान मुलांचा सुद्धा समावेश होता.
पॅसेंजर भरलेली गाडी घेऊन ड्रायव्हर निघायच्या तय्यारीतच तेवढ्यात एक पॅसेंजर मद्यपान करुन आला व त्याने गाडी चालु केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र गाडी रिव्हर्स गीअरमध्ये असल्यामुळे गाडी सरळ तलावात घुसली. सुदैवाने यात कुणालाही जीवीत हानी झालेली नाही. घटनेची माहीती मिळताच मुल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास चालू आहे.