Top News

छत्रपती शिवरायांची किर्ती पुन्हा दुमदुमणार #chandrapur #sherShivraj

पावनखिंडनंतर "शेर शिवराज" येणार रुपेरी पडद्यावर

महाराष्ट्राच दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आज पर्यंत अनेक चित्रपट आले आहेत. त्यात लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांवर आणखी एक चित्रपट येणार आहे. प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी फर्जंद, फत्तेशिकस्त या ऐतिहासिक चित्रपटानंतर पावनखिंड हा चित्रपट आणला.

हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. लवकर दिग्पाल लांजेकर शिवाजी महाराजांवर एक चित्रपट घेऊन येणार आहे. नुकतीच त्यांनी चित्रपटाची घोषणा केली आहे.

"शेर शिवराज" official trailer ( लिंकवर क्लिक केल्यानंतर इंस्टाग्राम ओपन करावे... नंतर काही वेळ थांबावे.... व्हिडिओ सुरू होणार)

https://www.instagram.com/tv/CbWfQdWNW_q/?utm_medium=copy_link

दिग्पाल यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या आगामी चित्रपटाचे नाव 'शेर शिवराज' आहे. चित्रपटाचं पोस्टर शेअर करत "अन्याय निवारण्यासाठी कणाकणांतून बाहेर पडणार, सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह शेर शिवराज २२ एप्रिल २०२२ हर हर महादेव", असे कॅप्शन दिले आहे. चित्रपटाच नावं समोर आलं असून चित्रपट प्रदर्शनाची तारिख घोषित करण्यात आली आहे. दि २२ एप्रिल २०२२ पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात पाहायला मिळेल.

दिग्पाल लांजेकर यांचं दिग्दर्शन असलेला पावनखिंड हा ऐतिहासिक चित्रपट १८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, अंकित मोहन यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चिन्मय मांडलेकरनं साकारली आहे. तर अजय पुरकर यांच्या अभिनयानं वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत जीव ओतला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने