Top News

रुग्णांसाठी देवदूत ठरले डॉ. निखिल टोंगे #chandrapur

चंद्रपूर:- चंद्रपुरातील शेंडे ले आऊट रामनगर येथील आनंद नागपुरे नामक व्यक्ती बऱ्याच दिवसांपासून गुडघ्याच्या त्रासातून जात होता. घरची परिस्थिती अत्यंत दयनीय होती. कारण घरी कुणीही कमविता व्यक्ती नव्हता आणि आई ही मनोरुग्ण आहे. अशी सर्व परिस्थिती डोळ्यासमोर असतांना उपचार कसे करावे हा मोठा प्रश्न आनंद यांच्यासमोर होता. #व्हायरलपोस्ट
ही बाब शेंडे लेआऊट, रामनगर येथे राहणारे शिवब्रिगेड संस्थेचे अध्यक्ष सतीश मालेकर यांना माहित झाल्यावर त्यांनी उपचारासाठी पुढे येऊन आर्थिक मदत केली. पुढे राजू किन्हेकर, मनोज गिरडकर, चंद्रपुर मनपा उपमहापौर राहुल पावडे यांनी सुद्धा उपचारासाठी आर्थिक मदत केली. परंतु डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितले. त्यामुळे आता ऑपरेशन कसे करावे हा मोठा प्रश्न होता.
ऑपरेशन बद्दलची माहिती चंद्रपुरातील डॉ. निखिल टोंगे यांना माहित झाल्यावर त्यांनी ऑपरेशन मोफत मध्ये करण्यासाठी पुढे आले आणि डॉ. निखिल टोंगे यांनी आनंद नागपुरे यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन मोफत करून समाजापुढे आदर्श निर्माण केला.
खरंतर आज आपण डॉक्टराकडे बघतो तेव्हा हातावर मोजता येईल इतकेच डॉक्टर वैद्यकीय सेवेसोबत समाजसेवा करत असतात नाही तर कितीतरी डॉक्टर अक्षरशः वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली रुग्णांकडून भरमसाठ फीज वसूल करतात. असे चित्र असतांना सुद्धा डॉ. टोंगे सरांनी दाखवली माणुसकी आणि कार्य नक्कीच प्रशंसनीय आहे. त्यांच्या सारखे डॉक्टर खरंच रुग्णांसाठी देवदूत आहेत असे म्हणावे लागेल.

आधार न्युज नेटवर्क परीवारा तर्फे डॉ.टोंगे यांच्या माणुसकीला सलाम...🙏🏻

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने