Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

ट्रकची दुचाकीला धडक #saolinews #saoli #accident


अपघातात तीन युवक गंभीर जखमी
सावली:- गडचिरोली वरुन येणाऱ्या ट्रकने व्याहाड वरुन येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तीन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना आज रविवार दिनांक 27 मार्च रोजी वाघोली बुटी फाट्याजवळ चंद्रपूर- गडचिरोली महामार्गावर सकाळी १०.०० वाजता घडली.

व्याहाड (बुज) वरुन तीन युवक गडचिरोली येथे दुचाकीने कामासाठी जात असताना वाघोली बुटी फाट्याजवळ गडचिरोली वरुन येणाऱ्या ट्रक क्र. एम. एच. 33 - 4360 ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीवरील तिन्ही युवक 10 ते 15 मीटर अंतरावर फेकले गेले. या भीषण अपघातात हे तिन्ही युवक गंभीर जखमी झाले आहेत. जखमी युवकांची नावे दिपक मुकुंदा मॅकलवार, रा. व्याहाड (बुज) आणि नेताजी मांदाळे व कैलास कन्नाके, दोघेही रा. वाकल अशी आहेत. अपघात झाल्यावर ट्रकचालक ट्रक सोडून फरार झाला आहे.
तिथे जमलेल्या नागरिकांनी खाजगी ऑटो द्वारे जखमींना गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत