Top News

चंद्रपूरात आझाद गार्डनच्या उद्घाटनावेळी गोंधळ #chandrapur


यंग चांदा ब्रिगेड आणि भाजपा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

आ. मुनगंटीवार आणि आ. जोरगेवार यांच्यात मंचावर बाचाबाची
चंद्रपूर:- शहरातील मध्यभागी असलेले मौलाना अबुल कलाम आझाद बगीच्याच्या उद्घाटन कार्यक्रमात जनप्रतिनिधींना स्थान न दिल्याने कार्यक्रमस्थळी मानापमान नाट्य झाल्याने एकच गोंधळ उडाला.
मौलाना अबुल कलाम आझाद बगीचाचे लोकार्पण सोहळा 

चंद्रपूर शहराचे हृदयस्थळ असलेल्या मौलाना अबुल कलाम आझाद बगीचाचे रूप पालटले असून, भव्यदिव्य, मनमोहक आणि आकर्षक असा बगीचा चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने साकारण्यात आला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा शनिवार, दिनांक २६ मार्च २०२२ रोजी रात्री पार पडला.
किशोर जोरगेवार कार्यक्रम स्थळी पोहचताच चंद्रपूर मनपा प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष....

26 मार्चला सायंकाळी जनप्रतिनिधींची राजकीय दंगल बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली, आमदार सुधीर मुनगंटीवार व खासदार बाळू धानोरकर कार्यक्रम स्थळी आधी उपस्थित झाले मात्र आमदार किशोर जोरगेवार कार्यक्रम स्थळी पोहचताच चंद्रपूर मनपा प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. 
अखेर महापौर राखी कंचर्लावार यांनी मध्यस्ती केल्यावर आमदार जोरगेवार कार्यक्रमस्थळी दाखल

पालिकेचा एकही शासकीय अधिकारी आमदार जोरगेवार यांना घेण्यासाठी आला नाही, ही बाब स्थायी समिती अध्यक्ष संदीप आवारी यांना समजताच ते आमदार जोरगेवार यांना घेण्यासाठी गेले असता त्याठिकाणी एकच गोंधळ उडाला होता. अखेर महापौर राखी कंचर्लावार यांनी मध्यस्ती केल्यावर आमदार जोरगेवार कार्यक्रमस्थळी दाखल झाले. 
ज्या व्यक्तीने आग लावली आहे ती आग मी विझविणार:- सुधीर मुनंगनटीवार

चंद्रपूर शहरातील नागरिकाकरिता महानगरपालिकेद्वारे उत्कृष्ट असा आझाद बगीचा तयार केला आहे. मात्र काही लोकांकडून त्याला राजशिष्टाचार याचे नाव देऊन राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्वांची सुरुवात आयुक्त मोहिते यांनी केली आहे. ज्या कुणी ही व्यक्तीने ही आग लावली असेल ती आग मुनगंटीवार विझविणार असल्याचे वक्तव्य आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 
आ. मुनगंटीवार आणि आ. जोरगेवार यांच्यात मंचावर बाचाबाची

आमदार सुधीर मुनगंटीवार सभा मंचाकडे आले. तेव्हा आ. किशोर जोरगेवार यांनी हातात माईक घेऊन भाषणाला सुरुवात केली. त्यावर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला आणि सूत्रसंचालन पद्धतीने कार्यक्रम होऊ द्या. आपला नंबर येईल त्यावेळी भाषण द्या, अशी विनंती केली. मात्र आधीच संतप्त झालेल्या आमदार किशोर जोरगेवार यांनी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यावेळी दोन्ही आमदारांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुरुवात केली. तेव्हा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी भाषणाला सुरुवात केली आणि मनातील पूर्ण संताप व्यक्त केला. 
मौलाना अबुल कलाम आझाद गार्डनच्या उद्धाटनाला उपस्थिती

उद्घाटन लोकलेखा समिती अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी खासदार बाळू धानोरकर यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांच्यासह सर्व नगरसेवकांची उपस्थिती होती.
समर्थकांनी जोरदार नारेबाजी

आमदार मुनगंटीवार व आमदार जोरगेवार मंचावर उपस्थित होताच त्यांच्या समर्थकांनी जोरदार नारेबाजी केली. 

यावेळी नागरिकांसह पोलिसांची मोठ्या संख्येत कार्यक्रमात उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने